फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनानुसार जुलैचा महिना खूप खास असणार आहे. या महिन्यामध्ये 6 ग्रह आपली स्थिती बदलत आहे. यामध्ये गुरु, शुक्र, मंगळ, बुध, सूर्य आणि शनि हे ग्रह त्यांची स्थिती बदलणार आहे. या बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना प्रगती, पैसा आणि सन्मानाशी संबंधित अनेक संधी मिळू शकतात. या महिन्यामध्ये ग्रहांच्या बदलांमुळे फक्त वैवाहिक जीवनच नव्हे तर व्यावसायिक, सामाजिक आणि करिअर क्षेत्रातही बदल होताना दिसून येतील. काही लोकांचे नशीब बदलू शकते तर काहींना कठोर मेहनत घ्यावी लागू शकते. जुलै महिन्यामध्ये कोणते ग्रह आपली स्थिती बदलणार आहे आणि याचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या
बुधवार, 9 जुलै रोजी गुरु ग्रह रात्री 10.50 वाजता मिथुन राशीत राहील.
रविवार, 13 जुलै रोजी सकाळी 9.36 वाजता शनि मीन राशीत वक्री करणार आहे.
बुधवार, 16 जुलै रोजी संध्याकाळी 5.40 वाजता सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
शुक्रवार, 18 जुलै रोजी सकाळी 10.13 वाजता बुध कर्क राशीत वक्री होईल.
शुक्रवार, 18 जुलै रोजी रात्री 8.14 वाजता बुध अस्त होईल.
शनिवार, 26 जुलै रोजी सकाळी 9.2 वाजता शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल.
सोमवार, 28 जुलै रोजी रात्री 8.11 वाजता मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल.
मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहांच्या हालचालीत होणारा बदल फायदेशीर ठरणार आहे. हे लोक कामात प्रगती करुन त्यांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. समाजामध्ये तुमचा आदर वाढलेला राहील. जुने वाद मिटतील. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते.
वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्यामध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला पूर्ण फळ मिळेल. नात्यांमध्ये गोडवा राहील आणि आरोग्यही चांगले राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्यातील करिअरमध्ये यश मिळेल. नातेसंबंधात गोडवा टिकून राहील. गुंतवणूक आणि परदेश प्रवासातून नफा मिळण्याची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. व्यवसायात काही नवीन योजना आखू शकतात.
जुलै महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या लोकांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. मालमत्ते संबंधित कोणताही निर्णय घेऊ शकता. नवीन मालमत्ता खरेदी करु शकता. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांना जुलै महिन्यामध्ये प्रगतीचा आणि उत्पन्न वाढवण्यासाठी हा महिना चांगला राहील. दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. करिअरमध्ये अनेक संधी प्राप्त होतील.
कुंभ राशीच्या लोकांचा जुलै महिना आनंदाचा राहील. व्यवसायात नफा, परीक्षेत यश आणि वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मालमत्ते संबंधित व्यवहार यशस्वी होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)