Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! भारतातील या राज्यात ४७ विद्यार्थ्यांचा एचाआयव्हीने मृत्यू, ८२८ विद्यार्थी एचाआयव्ही पोझिटिव्ह

भारतामधील एका राज्यात एचाआयव्हीबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. या राज्यात विद्यार्थ्यांमध्ये एचाआयव्ही संक्रमण वाढत असून तब्बल ८२८ विद्यार्थी एचाआयव्ही संक्रमित आढळले असून त्यातील ४७ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Jul 09, 2024 | 05:35 PM
सौजन्य- iStock

सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

एचआयव्ही: भारतातील एका राज्यातून एचआयव्हीसंदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. एचआयव्हीसंदर्भात अहवालानुसार, त्रिपुरामध्ये आतापर्यंत ८२८ विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर ४७ विद्यार्थ्यांचा या भयंकर आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “आतापर्यंत आम्हाला ८२८ विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी ४७ मुलांचा एचआयव्ही या प्राणघातक आजारामुळे जीव गेला आहे. एचआयव्ही संक्रमित अनेक विद्यार्थी देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी त्रिपुराच्या बाहेर गेले आहेत.”

त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीला २२० शाळा आणि २४ महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी आढळून आले जे इंजेक्शन औषधे, ड्रग्स वापरत आहेत. TSACS च्या सहसंचालकांनी ANI ला सांगितले की, आतापर्यंत २२० शाळा आणि २४ महाविद्यालये आणि विद्यापीठे तपासले गेली आहेत, जिथे विद्यार्थ्यांना इंट्राव्हेनसद्वारे इंजेक्शन देऊन ड्रग्सचे व्यसन आढळले आहे. आम्ही राज्यभरातील एकूण १६४ आरोग्य सुविधांमधून माहिती गोळा केली आहे. हे प्रेझेंटेशन करण्यापूर्वी जवळपास सर्व ब्लॉक आणि उपविभागातून अहवाल गोळा केला गेला.

सहसंचालक पुढे म्हणाले की, बहुतांश घटनांमध्ये श्रीमंत कुटुंबातील ही मुले एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. अशीही कुटुंबे आहेत जिथे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत आहेत आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यात त्यांना कसलीही हयगय नाही. त्यांची मुले ड्रग्जच्या आहारी गेल्याचे त्यांना कळले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

संसर्गाचे मुख्य कारण: ड्रग्ससाठी सुया शेअर करणे

एचआयव्ही/एड्स ही एक महत्त्वाची जागतिक आरोग्य समस्या आहे, जी थेट इंट्राव्हेनस ड्रग्सच्या गैरवापराशी संबंधित आहे. औषध वापरकर्त्यांमध्ये सुया शेअर करणे ही एचआयव्ही प्रसाराचे मुख्य कारण ठरले आहे, ज्यामुळे विषाणू रक्त-ते-रक्त या थेट सुईच्या संपर्काद्वारे पसरू शकतो. बऱ्याच क्षेत्रांमध्ये, अशा वर्तनामुळे नवीन एचआयव्ही संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. . सुया, सिरिंज किंवा इतर इंजेक्शन उपकरणे शेअर केल्याने एचआयव्ही संक्रमणाची शक्यता अत्यंत वाढते.

ड्रग्समुळे तरुणाच्या जीवाचा खेळ होत आहे. ड्रग्सच्या सेवनाने त्यांचे आरोग्य बिघडत आहे आणि अनेक आजार होत आहेत. त्यासोबत आता एचआयव्हीसारख्या धोकादायक रोगाचे संक्रमणही ड्रग्ससेवन आणि त्यासंबंधी वर्तणूकीमुळे होत आहे.  त्यामुळे यासंबंधी वेळीच जगजागृती आणि समुपदेशन होणे गरजेचे आहे. अन्यथा हे प्रमाण वाढू शकते.

Web Title: 47 students died of hiv in this state of india 828 students are hiv positive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • india
  • Tripura

संबंधित बातम्या

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?
1

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्
2

Viral Video: “याला म्हणतात खरी जिद्द…”, दोन्ही हात नाही तरी चालवली बाईक, गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल अवाक्

Defence Policy : पाकिस्तानविरोधात भारताचा आक्रमक पवित्रा; ‘New Normal’ सिद्धांतामुळे CISS ने व्यक्त केली युद्धाची भीती
3

Defence Policy : पाकिस्तानविरोधात भारताचा आक्रमक पवित्रा; ‘New Normal’ सिद्धांतामुळे CISS ने व्यक्त केली युद्धाची भीती

JD Busted : ‘तुम्ही उषाला भारतात पाठवा!’ Vance यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर हल्ला; ‘ढोंगी’ म्हणून निषेध
4

JD Busted : ‘तुम्ही उषाला भारतात पाठवा!’ Vance यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर हल्ला; ‘ढोंगी’ म्हणून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.