देशभरात रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन-तीन दिवसापुर्वी केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात (sabarimala temple ) दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतनााच आता राजस्थानमधून रस्ते अपघाताची मोठी (accident in kerala) बातमी समोर येत आहे. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर समोरून येणारी स्कूल बसही कारला धडकली. हा अपघात एवढा धोकादायक होता की पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.
[read_also content=”पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात टेम्पो कारवर उलटला; चौघांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/maharashtra/three-people-died-in-aacident-in-pune-nashik-highway-nrps-489696.html”]
ही संपूर्ण घटना श्रीमाधोपूर परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक महात्मा गांधी स्कूल बस मुलांना आमेरच्या दौऱ्यावर घेऊन परत येत होती. दरम्यान, चिलावली बसस्थानकावर कारने प्रथम दुचाकी आणि नंतर बसला धडक दिली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भाऊ, काका आणि पुतण्यांचा समावेश आहे. अनिल जांगीड वय 35 आणि त्याचा मोठा भाऊ सुभाष जांगीड वय 38 वय आहे. याशिवाय ४५ वर्षीय पप्पुराम, बजरंगलाल आणि जीतू वर्मा अशी त्यांची नावं आहेत. पप्पुराम आणि बजरंगलाल या दोघांचे काका-पुतण्याचे नाते आहे.