दिल्लीत 500 कोटींचा जल बोर्ड घोटाळा; भाजपचा केजरीवाल सरकारवर गंभीर आरोप

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी पत्रपरिषदेत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला. दिल्ली जल बोर्डातील घोटाळ्याबाबत (Water Board Scam) भाजपच्या प्रवक्त्याने अनेक दावे केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले आहेत.

    नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी पत्रपरिषदेत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला. दिल्ली जल बोर्डातील घोटाळ्याबाबत (Water Board Scam) भाजपच्या प्रवक्त्याने अनेक दावे केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप सातत्याने ‘आप’ला कोंडीत पकडत आहे.

    गौरव भाटिया म्हणाले, दिल्ली जल बोर्डाशी संबंधित घोटाळा समोर आला आहे. 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या बांधकामात घोटाळा झाला आहे. त्यातील काही अपग्रेड करायचे होते, तर काहींची क्षमता वाढवण्याची योजना होती. त्यासाठी कंत्राटदारांना कंत्राट दिले गेले, त्याचा अंदाजित खर्च चुकीचा होता. तो सुमारे 500 कोटींचा घोटाळा आहे. वास्तवात, अंदाजे खर्च 1500 कोटी रुपये असताना 1950 कोटी रुपयांना कंत्राट देण्यात आले, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. भ्रष्टाचार, लबाडी आणि फसवणूक या कलेत प्रभुत्व मिळवणारा कोणी राजकारणी असेल तर तो अरविंद केजरीवाल आहे, असा आरोपही त्यांनी केला.

    भ्रष्टाचारात पीएच.डी.धारक

    भाटिया पुढे म्हणाले, भाजपा सरकार भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम राबवत असून भ्रष्टाचारात गुंतलेला प्रत्येक नेता तुरुंगात असेल. यापूर्वी दिल्ली सरकारचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. याशिवाय संजय सिंह आणि सत्येंद्र जैन हेही वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत, असेही ते म्हणाले.