उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; ढगफुटी नंतर वाहून आलेल्या मलब्यात अनेक घरं उद्ध्वस्त, ६० जण बेपत्ता
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मोठी दुर्घटना घडली आहे हर्षिल येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर वाहून आलेल्या मलब्यात अनेक जण गाडले गेले आहेत. तर काही घरं पूर्णपणे उदध्वस्त झाली आहेत. ६० जण बेपत्ता असण्याची भीती आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये अवघ्या २० सेकंदात सर्व काही नष्ट होतानाचं भयानक दृश्य दिस आहे.
#Uttarkashi -Cloud Burstin Uttarkashi… Small houses washed awayBuildings have been washed away – housed under debris – people injured- Rescue teams have moved pic.twitter.com/RJ3f6tP8Re
— Smriti Sharma (@SmritiSharma_) August 5, 2025
मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उद्ध्वस्त
प्राथमिक माहितीनुसार, अनेक हॉटेलमध्ये पाणी शिरलं आहे. घरे आणि दुकानांमध्येही वाहून आलेला मलबा शिरला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धाराली बाजारपेठ परिसरातही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बचाव पथके रवाना झाली आहेत.
माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. भटवाडी येथील एसडीआरएफ टीम देखील धारलीला रवाना झाली आहे. हर्षिलजवळील धारली येथे ढगफुटीची मोठी घटना घडली आहे. बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. अशी माहिती उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिली.
Uttarkashi Police says, “In Uttarkashi, due to the rising water level of Kheer Gadh in the Harsil area, reports of damage in Dharali have prompted police, SDRF, army, and other disaster response teams to engage in relief and rescue operations at the site.” pic.twitter.com/415d3Anzfk
— ANI (@ANI) August 5, 2025
उत्तराखंड पोलिसांचे आवाहन
उत्तरकाशी पोलिसांनी या घटनेची माहिती सोशल मीडिया एक्स वर शेअर केली. हर्षिल परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने धारलीमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच, पोलिस, एसडीआरएफ आणि लष्कर यासारख्या आपत्ती पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. नदीपासून योग्य अंतर आणि सुरक्षितस्थळी जाण्याचं आव्हान पोलिसांनी केलं आहे.