Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तराखंडमध्ये 6000 पोलिस, PAC च्या १७ आणि पॅरा मिलिटरीच्या 10 कंपन्या तैनात; नक्की कारण काय?

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये लवकरच सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा १ मे पासून सुरू होणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 29, 2025 | 09:23 PM
उत्तराखंडमध्ये 6000 पोलिस, PAC च्या १७ आणि पॅरा मिलिटरीच्या 10 कंपन्या तैनात; नक्की कारण कारण काय?

उत्तराखंडमध्ये 6000 पोलिस, PAC च्या १७ आणि पॅरा मिलिटरीच्या 10 कंपन्या तैनात; नक्की कारण कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये लवकरच सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा १ मे म्हणजेच बुधवारपासून  सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रा मार्गांवर सुमारे 6000 पोलिस, 17 PAC (प्रोव्हिंशियल आर्म्ड कॉन्स्टेबलरी) कंपन्या आणि 10 अर्धसैनिक दलांच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक (DGP) दीपम सेठ यांनी दिली.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची हाय व्होल्टेज बैठक; संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही सैन्यप्रमुखांची उपस्थिती

गुप्तचर यंत्रणा अलर्टवर

DGP सेठ यांनी सांगितले की, अपघाताची शक्यता असलेल्या 65 हून अधिक ठिकाणी SDRF चे (राज्य आपत्ती निवारण बल) जवान तैनात केले जातील. याशिवाय, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. गुप्तचर यंत्रणाही सतर्क ठेवण्यात येणार असून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

60 लाखांहून अधिक भाविकांची अपेक्षा

या वर्षीच्या चारधाम यात्रेत सुमारे 60 लाख भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 48 लाख भाविक आले होते, मात्र त्या वेळी अतिवृष्टीमुळे केदारनाथ ट्रॅक रस्ता खराब झाला होता आणि यात्रा दोन आठवड्यांहून अधिक काळ बंद ठेवावी लागली होती.

केदारनाथचे दरवाजे २ मे, तर बद्रीनाथचे ४ मे रोजी उघडणार

चारधाम यात्रा उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांच्या दरवाजे उघडण्याने सुरू होईल. केदारनाथचे दरवाजे २ मे रोजी, तर बद्रीनाथचे दरवाजे ४ मे रोजी उघडण्यात येणार आहेत.

India-Pakistan Tension : लवकरच भारतासोबत युद्ध, आम्ही हाय अलर्टवर; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचं विधान

यात्रा क्षेत्र १५ सुपर झोनमध्ये, २००० CCTV कॅमेरे

संपूर्ण यात्रा मार्ग १५ सुपर झोनमध्ये विभागण्यात आला आहे आणि २००० हून अधिक CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय, गढ़वाल रेंजमध्ये एक इंटीग्रेटेड कमांड सेंटर स्थापन करण्यात आले आहे. DGP सेठ यांनी ऋषिकेशमधील ट्रान्झिट कॅम्पमध्ये भाविकांशी भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्यांना निर्भयपणे यात्रा करण्याचे आश्वासन दिले.

मंदिरात फोटो/व्हिडीओवर बंदी,

चारधाम यात्रा अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित बनवण्यासाठी, प्रशासनाने यंदा बद्रीनाथ धाममध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत. मंदिर परिसरात फोटो काढणे व व्हिडिओ कॉलिंगवर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित भाविकांकडून ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

Web Title: 6000 police security on char dham yatra route after pahalgam attack latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • Kedarnath
  • Kedarnath Dham Darshan
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…
1

IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…

Uttarakhand Disaster : पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर; पुनर्वसनासाठी केंद्राकडून मोठ्या मदतीचे संकेत
2

Uttarakhand Disaster : पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर; पुनर्वसनासाठी केंद्राकडून मोठ्या मदतीचे संकेत

Uttarakhand Cloudburst: निसर्गाचा महाप्रकोप! उत्तरकाशीत ढगफुटी; बघता बघता 6 पेक्षा जास्त…
3

Uttarakhand Cloudburst: निसर्गाचा महाप्रकोप! उत्तरकाशीत ढगफुटी; बघता बघता 6 पेक्षा जास्त…

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप; रूद्रप्रयागमध्ये ढगफुटी, 2 नागरिक बेपत्ता तर…
4

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप; रूद्रप्रयागमध्ये ढगफुटी, 2 नागरिक बेपत्ता तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.