Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नैनितालमध्ये भीषण अपघात, जीप खड्ड्यात पडल्याने सात जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील ओखल कांडाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 18, 2023 | 11:24 AM
नैनितालमध्ये भीषण अपघात, जीप खड्ड्यात पडल्याने सात जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:

नैनितालमध्ये शुक्रवारी (17 नोव्हेंबर) सकाळी मोठा अपघात झाला. नैनितालच्या ओखल कांडा गावाजवळ एक जीप ५०० मीटर खड्ड्यात पडली, त्यात नभ जणांचा जागीच मृत्यू झाला. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, असे सांगण्यात येत आहे. चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप खोल दरीत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

[read_also content=”आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, परवानगीशिवाय उड्डाणपुलाचं केलं उद्घाटन! https://www.navarashtra.com/maharashtra/case-registered-against-aditya-thackeray-in-acse-of-illegalityoepning-of-481560.html”]

सध्या पोलीस घटनास्थळी उपस्थित असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातात गाडीत किती लोक होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी पुढे पाठवले जात आहे. ही घटना सकाळी आठ वाजताची असल्याचे सांगण्यात येत आहे.

मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश

पिकअप वाहन ५०० मीटर खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा अपघात झाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये तीन महिला, एक बालक आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. येथील रस्ता खराब असल्याने वाहन नियंत्रण सुटून खोल खड्ड्यात पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सोमवारीही झाला अपघात

याआधी गेल्या सोमवारीही नैनितालमध्ये कार खड्ड्यात पडून अपघात झाला होता. उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील जौरासीजवळ सोमवारी सकाळी कार खड्ड्यात पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. छतर सिंग असे मृताचे नाव असून तो उत्तराखंडच्या पिथौरागढ येथील रहिवासी आहे.

याशिवाय, गेल्या ऑक्टोबर महिन्यात नैनिताल जिल्ह्यातील कालाधुंगी परिसरात प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पडून पाच महिला आणि एका अल्पवयीनासह सात प्रवासी ठार झाले होते, तर अनेक जण जखमी झाले होते.

Web Title: 9 people died and 4 injured in accident at nainital after jeep fell into dtch nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2023 | 11:24 AM

Topics:  

  • Uttarakhand

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.