Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

Ancient Temple : भारताच्या उत्तराखंड राज्यात एक असे अनोखे मंदिर वसले आहे जिथे मनातील इच्छा-आकांशा चिठ्ठीवर लिहून देवाला अर्पण केल्या जातात. धार्मिक पर्यटनाची आवड असल्यास एकदा तरी या ठिकाणाला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 10, 2026 | 08:07 AM
Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

Follow Us
Follow Us:
  • उत्तराखंडमधील अल्मोडा हे धार्मिक पर्यटनासोबतच निसर्गसौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.
  • येथील एका अनोख्या मंदिरात भाविक आपल्या मनातील इच्छा चिठ्ठीद्वारे व्यक्त करतात.
  • अल्मोडामध्ये नंदा देवी मंदिर आणि १२४ मंदिरांचे संकुल असलेले जागेश्वर हेही पाहण्यासारखे ठिकाण आहे.
रोजच्या बोरींग जीवनाला कंटाळून जर तुम्ही कुठे चांगल्या ठिकाणी फिरण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला धार्मिक पर्यटनाची आवड असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. धार्मिक पर्टनासाठी भारतात अनेक सुंदर मंदिरे पाहायला मिळतील. प्रत्येक मंदिराची आपली अशी वेगळी खासियत असते. आता देवाच्या दर्शनासाठी गेल्यावर आपण मनात काही ना काही इच्छा आकांशा आवर्जून घेऊन जात असतो. देवाचे दर्शन घेत मनातल्या मनात या इच्छा देवासमोर मांडल्या जातात. पण तुम्हाला माहितीये का? उत्तराखंडमध्ये एक असे अनोखे मंदिर वसले आहे जिथे देवासमोर इच्छा व्यक्त केली जात नाही. इथे भाविक देवाला चिठ्ठी लिहून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात.

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

कुठे आहे हे मंदिर?

उत्तराखंडमधील अल्मोडा या ठिकाणी देवाचे हे अनोखे मंदिर वसले आहे. चिताई गोलू देवता मंदिर असे याचे नाव आहे. हिमालयाचे सुंदर दृष्य, जुने मंदिर आणि शांत वातावरणासाठी अल्मोडा लोकप्रिय आहे. भक्त मंदिर परिसरात घंटा अर्पण करतात आणि त्यावर आपल्या इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या अर्पण करतात. अल्मोडापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक टॅक्सीची मदत घ्यावी लागले. येथील डोंगरांमध्ये सूर्याेदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृष्य पाहता येते.

नंदा देवी मंदिर

अल्मोडा शहरात आणखी एक लोकप्रिय देवीचे मंदिर आहे ज्याचे नाव आहे नंदा देवी मंदिर. धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्हींमध्ये याचे महत्त्व फार आहे. मंदिराची वास्तुकला आणि स्थानिक परंपरा या ठिकाणाला इतर पर्यटन ठिकाणांहून वेगळी बनवते.

एकाच ठिकाणी 124 मंदिरांचा संघ

अल्मोडापासून साधारण ३६ किमी अंतरावर जागेश्वर मंदिर संकुल पाहता येते. उत्तराखंड पर्यटन विभागानुसार, इथे एकाच ठिकाणी तब्बल १२४ मंदिरांचा संघ पाहायला मिळतो. तथापि, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने संकुलातील अनेक मंदिरांना संरक्षित स्मारके म्हणून सूचीबद्ध केले आहे.

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

मुंबईहून अल्मोडा कसे जावे?

यासाठी तुम्ही विमान किंवा रेल्वे मार्गाचा वापर करु शकता. मुंबईहून दिल्लीपर्यंत रस्ते प्रवास खूप लांब आणि थकवणारा ठरेल. विमान प्रवासासाठी मुंबई एअरपोर्टवरुन तुम्ही पंतनगर विमानतळासाठी किंवा दिल्ली विमानतळासाठी फ्लाईट पकडू शकता. आता रेल्वे मार्गासाठी तुम्हाला मुंबईहून उत्तराखंडमधील काठगोदाम रेल्वे स्थानकासाठी ट्रेन पकडावी लागेल. काठगोदाम हे अल्मोड्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

Web Title: Almora uttarakhand unique temple wish letters chitai golu devta nanda devi jageshwar temples nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • indian tourism
  • travel news
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
1

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
2

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
3

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

Badrinath : बद्रीनाथ धामचा नवा विक्रम, 18.67 लाख पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन
4

Badrinath : बद्रीनाथ धामचा नवा विक्रम, 18.67 लाख पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.