Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railway : महिलांसह ज्येष्ठांना रेल्वेकडून मोठी भेट; आता तिकीट बुकिंग करताच आपोआपच मिळणार…

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी केली जात आहे. त्यातच आता राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 07, 2025 | 02:30 PM
महिलांसह ज्येष्ठांना रेल्वेकडून मोठी भेट; तिकीट बुकिंग करताच आपोआपच मिळणार 'लोअर बर्थ'

महिलांसह ज्येष्ठांना रेल्वेकडून मोठी भेट; तिकीट बुकिंग करताच आपोआपच मिळणार 'लोअर बर्थ'

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून भारतीय रेल्वेला प्राधान्य दिलं जातं. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेकडूनही अनेक महत्त्वाची पावलं उचलेली जात आहेत. त्यातच आता रेल्वेने ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना एक भेट दिली आहे. यापुढे रेल्वे प्रवास करणारे ज्येष्ठ आणि 45 वर्षांवरील महिलांना आता आपोआप लोअर बर्थ (खालचे बाकडे) देण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी केली जात आहे. त्यातच आता राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. रेल्वेने वेगवेगळ्या वर्गामध्ये खालच्या बर्थसाठी विशिष्ट कोटा स्थापित केला आहे. स्लीपर क्लासमध्ये ६-७ लोअर बर्थ, ३ एसीमध्ये ४-५ लोअर बर्थ आणि २ एसीमध्ये ३-४ लोअर बर्थ असणार आहे. हे बर्थ केवळ ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आणि गर्भवती महिलांसाठी राखीव असतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : Railway Special Trains: विमानप्रवासाच्या संकटात रेल्वेची साथ! मेगा प्लॅन, पुढील 3 दिवस धावणार 89 स्पेशल ट्रेन्स

रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, नवीन आणि अपग्रेड केलेल्या कोचमध्ये रुंद दरवाजे, रुंद बर्थ आणि मोठे डबे, व्हीलचेअरसाठी जागा, रुंद दरवाजे असलेली शौचालये आणि शौचालयात आधार देण्यासाठी अतिरिक्त ग्रॅब रेल अशा विशेष सुविधांसह सुसज्ज केले जात आहेत. अमृत भारत आणि वंदे भारत गाड्यांमध्ये देखील विशेष तरतूदी केल्या जातील.

अपंगांचाही केला जाणार विचार

अपंगांच्या गरजा लक्षात घेऊन या गाड्या डिझाईन केल्या आहेत. ‘वंदे भारत’चे पहिले आणि शेवटचे कोच व्हीलचेअर प्रवेश, रुंद शौचालये आणि सहज हालचाल करण्यास सक्षम आहेत. मेल/एक्सप्रेस, राजधानी आणि शताब्दी गाड्‌यांमध्ये अपंग प्रवाशांसाठी आणि त्यांच्या सोबत्यांसाठी विशेष आरक्षणे आहेत. नियमांनुसार, चार बर्थ (दोन खालच्या आणि दोन मधल्या) स्लीपर आणि ३एसी/३ई वर्गासाठी राखीव आहेत आणि चार बर्थ २एस/सीसी साठी राखीव आहेत.

Web Title: A big gift from the railways to women and senior citizens you will automatically get a lower berth as soon as you book a ticket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Railway Tickets

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा ‘डल्ला’! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल, भुसावळ दुसऱ्या तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी
1

रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा ‘डल्ला’! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल, भुसावळ दुसऱ्या तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी

Indian Railway: तत्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! काउंटरवरून तिकीट घेताना ‘हा’ नवा नियम लागू
2

Indian Railway: तत्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! काउंटरवरून तिकीट घेताना ‘हा’ नवा नियम लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.