Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राघव, तुम्ही घाबरलेले..PM मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता; AAP नेत्याने सगळंच काढलं बाहेर

Raghav Chadha News : आम आदमी पक्षाचे माध्यम प्रमुख अनुराग ढांडा यांनी खासदार चड्ढांना तुम्ही पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता असे म्हटल्याने वादात ठिणगी पडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2026 | 01:17 PM
AAP Leader Anurag Dhanda Replies to MP Raghav Chadha AAP Political News

AAP Leader Anurag Dhanda Replies to MP Raghav Chadha AAP Political News

Follow Us
Follow Us:
  • राघव चड्ढांनी सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी
  • राघव चड्ढा पंतप्रधान मोदींविरोधात बोलायला घाबरतात
  • आप नेते अनुराग ढांडा यांची चड्ढांवर टीका
Raghav Chadha News : नवी दिल्ली: आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरु झाला असल्याचे दिसून आले आहे. आप खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरुन काढून टाकण्यात आले असून त्यांना राज्यसभेत बोलू दिले जाऊ नये अशी मागणी त्यांच्याच पक्षाकडून करण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेल्या राघव चढ्डा (Raghav Chadha) यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मी शांत आहे म्हणजे मी हार मानलेली नाही असे म्हणत आप पक्षाला खडेबोल सुनावले. यानंतर आता आम आदमी पक्षाचे (AAP) माध्यम प्रमुख अनुराग ढांडा यांनी खासदार चड्ढांना तुम्ही पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता असे म्हटल्याने वादात ठिणगी पडली आहे.

खासदार राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया पोस्टमधून पक्षावर आपली नाराजी व्यक्त केली. यामधून त्यांनी पक्षावर अप्रत्यक्षपणे आरोप देखील केले. यावर आप नेते अनुराग ढांडा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन राघव यांची पोलखोल केली. त्यांनी लिहिले की, आम्ही केजरीवालचे सैनिक आहोत. निर्भयता ही आमची मुख्य ओळख आहे. जर कोणी मोदींना घाबरत असेल, तर ते देशासाठी लढतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”

अनुराग ढांडा यांनी पुढे लिहिले की, “पक्षाला संसदेत बोलायला थोडाच वेळ मिळतो आणि त्या वेळेत आम्ही एकतर देश वाचवण्यासाठी लढू शकतो किंवा विमानतळावरील कॅन्टीनमध्ये समोसे स्वस्त करू शकतो. गुजरातमध्ये भाजप पोलिसांनी आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. खासदारांनी सभागृहात काही सांगितले का?”

हम केजरीवाल के सिपाही हैं। निडरता पहली पहचान है हमारी। कोई मोदी से डर जाए तो लड़ेगा क्या देश के लिए? संसद में थोड़ा सा समय मिलता है बोलने का पार्टी को, उसमें या तो देश बचाने का संघर्ष कर सकते हैं या एयरपोर्ट कैंटीन में समोसे सस्ते करवाने का। गुजरात में हमारे सैंकड़ों… — Anurag Dhanda (@anuragdhanda) April 3, 2026

“पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा हक्क काढून घेतला जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात सभागृहात एक प्रस्ताव मांडण्यात आला, पण भाईसाहेबांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. जेव्हा पक्ष सभागृहातून बाहेर पडला, तेव्हा ते मोदींची उपस्थिती नोंदवण्यासाठी जागेवरच बसून राहिले. गेल्या काही वर्षांपासून तू घाबरला आहेस, राघव. तू मोदींच्या विरोधात बोलायला घाबरतोस. तू देशाच्या खऱ्या समस्यांवर बोलायला घाबरतोस,” अशी घणाघाती टीका आप नेते अनुराग ढांडा यांनी खासदार राघव चड्ढा यांच्यावर केली आहे. त्यामुळे आम आदमी पक्षातील हेवेदावे हे सर्वांसमोर आले आहेत.

हे देखील वाचा :  Raghav Chadha यांची जागा घेणारे कोण आहेत अशोक कुमार मित्तल? कोट्यवधींची संपत्ती अन् शैक्षणिक पार्श्वभूमी

 

Web Title: Aap leader anurag dhanda replies to mp raghav chadha aap political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • AAP
  • AAP Arvind Kejriwal
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप
1

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

आम आदमी पक्षाला मोठा धक्का! AAP आमदाराला 7 वर्षांचा तुरुंगवास, पत्नींसह 9 जणांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
2

आम आदमी पक्षाला मोठा धक्का! AAP आमदाराला 7 वर्षांचा तुरुंगवास, पत्नींसह 9 जणांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.