Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLA Raman Arora : पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक

पंजाब दक्षता विभागाने आम आदमी पक्षाचे (आप) आमदार रमन अरोरा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. अरोरा हे जालंधर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: May 23, 2025 | 04:59 PM
पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक

पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक

Follow Us
Close
Follow Us:

पंजाब दक्षता विभागाने आम आदमी पक्षाचे (आप) आमदार रमन अरोरा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. अरोरा हे जालंधर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. दक्षता विभागाने जालंधर येथील त्यांच्या घरावर छापा टाकला. झडतीनंतर त्यांना अटक करण्यात आली. रमन अरोरा यांनी काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून सामान्य लोकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भारतीय लष्कर दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; एक जवान शहीद

काय आहे प्रकरण?

दक्षता विभागाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमन अरोरा यांच्यावर काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून सामान्य लोकांना खोट्या नोटिसा पाठवल्याचा आरोप आहे. यातून सामान्य लोकांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करण्यात येत होते. हे प्रकरण जालंधर महानगरपालिकेशी संबंधित आहे आणि अरोरा यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

रमन अरोरा कोण आहेत?

५४ वर्षीय रमन अरोरा हे जालंधर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आप सरकारमधील एक महत्त्वाचा चेहरा मानले जातात. अलीकडेच, राज्य सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, या निर्णयाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचं म्हटलं होतं.  रमन अरोरा यांच्याकडे यापूर्वी १४ बंदूकधारी सुरक्षा पथक होतं.

“…तर फासावर लटकवा पण उगीच माझी बदनामी”; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर अजित पवार संतापले

आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया

दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान माध्यमांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. परंतु आम आदमी पक्षाने एक्स वर पोस्ट करून कारवाईचे समर्थन केलं आहे. भगवंत मान सरकारची भ्रष्टाचाराविरोधी ही मोठी कारवाई आहे. कोणीही कायद्यापेक्षा वर नाही. जरी ते आपमध्ये असले तरी. बनावट नगरपालिका सूचना, खंडणी आणि डीजिटल घोटाळ्यांसाठी आमदार रमन अरोरा यांच्यावर दक्षता पथकाने छापा टाकला. हीच खरी जबाबदारी आहे, असं पक्षाने म्हटलं आहे.

Web Title: Aap mla raman arora arrest by punjab police vigilance bureau on corruption charges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Aam Aadmi Party
  • AAP
  • Punjab Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.