Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election 2025: बिहार निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ‘आप’ पक्षाची मोठी खेळी; ११ जागांवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होती. यात पहिलया टप्प्यात ६ नोव्हेंबरला मतदान होती. तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 06, 2025 | 06:19 PM
बिहार निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच 'आप' पक्षाची मोठी खेळी (Photo Credit- X)

बिहार निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच 'आप' पक्षाची मोठी खेळी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ‘आप’ पक्षाची मोठी खेळी
  • ११ जागांवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर
  • २४३ जागा स्वबळावर लढवणार

Bihar Election 2025: बिहारच्या विधासभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात होती. यात पहिलया टप्प्यात ६ नोव्हेंबरला मतदान होती. तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जातील. पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर मतदान होणार आहे. पण त्या आधीच २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (AAP) मोठी राजकीय खेळी करत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

२४३ जागा स्वबळावर लढवणार

पक्षाचे बिहार प्रभारी अजेश यादव आणि प्रदेशाध्यक्ष राकेश यादव यांच्या उपस्थितीत पाटणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ‘आप’ राज्यात सर्वच्या सर्व २४३ जागा स्वबळावर लढवणार असून बिहारच्या द्विध्रुवीय राजकारणाला तिसरा पर्याय देण्याचा पक्षाचा संकल्प आहे.

११ जागांसाठी उमेदवारांची घोषणा

आम आदमी पक्षाने सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यात ११ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. या ११ उमेदवारांमध्ये दोन महिलांना नामांकित करण्यात आले आहे. हे उमेदवार स्थानिक समस्या समजून घेतात आणि राज्याच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

AAP releases the first list of 11 candidates for the upcoming Bihar Assembly elections. pic.twitter.com/aTz1y4om5Y — ANI (@ANI) October 6, 2025

हे देखील वाचा: Bihar Election 2025: महिला बुरखा घालून मतदान करू शकतील का? निवडणूक आयोगाने घेतला महत्त्वाचा निर्णय

भाजप-महाआघाडीच्या आधी ‘आप’ची पहिली यादी

राज्यात एनडीए आणि महाआघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा अद्याप सुरू असताना, या दोन्ही प्रमुख गटांनी आपली पहिली यादी जाहीर केलेली नाही. बिहार निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करणारा ‘आप’ हा पहिला पक्ष ठरला आहे, ज्यामुळे इतर पक्षांवर दबाव वाढला आहे.

‘केजरीवाल मॉडेल’वर लढणार निवडणूक

बिहारमधील आम आदमी पक्षाची रणनीती दिल्ली आणि पंजाबमध्ये यशस्वी ठरलेल्या “केजरीवाल मॉडेल” वर आधारित आहे, जे शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक कल्याणावर भर देते. निवडणूक प्रचार स्थलांतर, बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित असेल.

अजेश यादव म्हणाले, “बिहारमधील तरुण रोजगाराच्या शोधात राज्य सोडत आहेत, महागाईमुळे जीवन कठीण झाले आहे आणि भ्रष्टाचार कायम आहे. बिहारमधील लोकांना प्रामाणिकपणा आणि विकासावर आधारित पर्याय हवा आहे.”

जम्मू-काश्मीरसह ७ राज्यांमधील ८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या

Web Title: Aap releases first list of candidates for 11 seats in bihar elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • AAP
  • Bihar Election
  • Bihar Election 2025

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरसह ७ राज्यांमधील ८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या
1

जम्मू-काश्मीरसह ७ राज्यांमधील ८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या

Bihar Election 2025: बिहारमध्ये आजपासून आचार संहिता लागू; कोणत्या कामांवर बंदी? उल्लंघन केल्यास…
2

Bihar Election 2025: बिहारमध्ये आजपासून आचार संहिता लागू; कोणत्या कामांवर बंदी? उल्लंघन केल्यास…

Bihar Election 2025: महिला बुरखा घालून मतदान करू शकतील का? निवडणूक आयोगाने घेतला महत्त्वाचा निर्णय
3

Bihar Election 2025: महिला बुरखा घालून मतदान करू शकतील का? निवडणूक आयोगाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Bihar Election 2025 : बिहारमधील ‘या’ विद्यमान आमदारांचे तिकिटे भाजप रद्द करू शकते, वाचा संपूर्ण यादी
4

Bihar Election 2025 : बिहारमधील ‘या’ विद्यमान आमदारांचे तिकिटे भाजप रद्द करू शकते, वाचा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.