Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी नको ! देशात दोन महिन्यांचा पुरेसा इंधनसाठा; केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

जर कच्च्या तेलाच्या किमती जास्त राहिल्या आणि किरकोळ दरात बदल झाला नाही, तर सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांना एका तिमाहीत १ लाख कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान होऊ शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2026 | 09:28 AM
देशात २ महिन्यांचा इंधनसाठा

देशात २ महिन्यांचा इंधनसाठा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : इराण-अमेरिका या देशांत तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इराणनेही आक्रमक भूमिका घेत इंधन पुरवठ्यावर बंधने आणली आहेत. असे असताना इंधनाच्या साठ्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ‘आता जागतिक ऊर्जा संकट असूनही भारताकडे दोन महिन्यांचा इंधनसाठा असल्याने पुरवठ्याबाबत कोणतीही चिंता नाही’, असे पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले.

जर कच्च्या तेलाच्या किमती जास्त राहिल्या आणि किरकोळ दरात बदल झाला नाही, तर सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांना एका तिमाहीत १ लाख कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान होऊ शकते. पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात किती काळ विकू शकतात, याचे मूल्यांकन करणे आवश्यक असेल. मात्र, त्यांनी दरवाढीच्या शक्यतेवर भाष्य करण्यास नकार दिला. किरकोळ किमती स्थिर ठेवल्यामुळे वाढणाऱ्या आर्थिक दबावाचीही मंत्र्यांनी कबुली दिली.

केंद्रीयमंत्री पुरी म्हणाले की, पेट्रोलियम कंपन्यांना दररोज १००० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांमधील एकूण तफावत अंदाजे १.९८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. एका तिमाहीत १ लाख कोटी रुपयांचा तोटा झाल्यास संपूर्ण क्षेत्राचा वार्षिक नफा नाहीसा होऊ शकतो.

गेल्या 10 आठवड्यांपासून…

गेल्या १० आठवड्यांपासून पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू असूनही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) कच्चे एलएनजी, एलपीजी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) या सरकारी मालकीच्या पेट्रोलियम विपणन कंपन्यांनी अखंड पुरवठा सुनिश्चित केला आहे. आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये ५० टक्के वाढ होऊनही, पेट्रोल आणि डिझेल दोन वर्षांपूर्वीच्याच दराने विकले जात आहेत.

पुरवठ्यासंदर्भात कोणतीही समस्या नाही

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या वार्षिक व्यावसायिक परिषदेत मंत्री म्हणाले की, आम्हाला पुरवठ्याशी संबंधित कुठलीही समस्या नाही. त्यांनी स्पष्ट केले की, भारताने पुरेशा साठ्यासह या संकटाची सुरुवात केली. तेव्हापासून देशांतर्गत एलपीजी उत्पादन दररोज ३६००० टनांवरून ५४००० टनांपर्यंत वाढवले आहे.

Fuel Shortage: संभाजीनगरमध्ये इंधन संकट ! पेट्रोल-डिझेलसाठी रांगा, तर गॅस सिलिंडरसाठी १२ दिवसांचे वेटिंग; प्रशासनाचा दावा फोल?

Web Title: Adequate fuel stock for two months in india central government provides significant information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Fuel Supply
  • Iran US Israel

संबंधित बातम्या

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!
1

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!

होर्मुझ संकटातही इंधनटंचाई नाही; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा दावा
2

होर्मुझ संकटातही इंधनटंचाई नाही; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.