Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इकडे RBI नं वाढवला रेपो रेट तिकडे ‘या’ बॅंकेचे कर्ज झाले महाग

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत माहिती दिली. त्यानुसार, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर, 8 ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर (RLLR) 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 06, 2022 | 11:20 AM
The bank was robbed by a former manager

The bank was robbed by a former manager

Follow Us
Close
Follow Us:

शुक्रवारी आरबीयने (RBI) रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. यामुळे कर्ज महागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ही शक्यता खरी ठरली असून, या लागलीच खासगी क्षेत्रातील आयसीआयलीआय (ICIICI) आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने(Punjab National Bank) व्याजदरात वाढ करण्याच निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे 5 ऑगस्ट 2022 रोजीपासूनच या दोन्ही बँकेचा व्याजदर प्रभावी राहणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना आता वाढीव व्याजदराने कर्ज (Loan) उपलब्ध होईल. या दोन बँकांनी व्याजदर वाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर बँकांही तातडीने व्याजदर वाढीचा निर्णय घोषीत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

[read_also content=”कुस्तीपटू मोहित ग्रेवलनने आणि दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक https://www.navarashtra.com/sports/wrestlers-mohit-grewalan-and-divya-kakran-won-bronze-medals-312581.html”]

नेमकं किती व्यादरवाढ?
ICICI बँकेने व्याजदरवाढी विषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ICICI बँक बाह्य मानक कर्ज दर म्हणजेच बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर (I-EBLR) RBI च्या रेपो दरावर आधारीत आहेत. केंद्रीय बँकेच्या धोरणानुसार त्यात बदल होतो. रेपो दरात वाढ झाल्याने आयसीआयसीआय बँकेने कर्जावरील व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. I-EBLR आता वार्षिक 9.10 टक्के असून तो 5 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल असे बँकेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनेही दर वाढीबाबत माहिती दिली. त्यानुसार, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर, 8 ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर (RLLR) 7.40 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आला आहे. हा वाढीव दर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल. रेपो दरावर कर्जाचे दर अवलंबून असतात. रेपोमधील कोणताही बदल झाला की त्यानुसार दर वाढतो किंवा कमी होतो. बँका त्याआधारे कर्जावरील व्याजदरात बदल करतात.

[read_also content=”पाकिस्तानी खेळाडूला लोळवत दीपक पुनियाचा “सुवर्ण” विजय https://www.navarashtra.com/sports/deepak-punias-golden-victory-by-beating-a-pakistani-player-312567.html”]

Web Title: After hiking in rbi repo rate there the loan of some bank has become expensive nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2022 | 11:17 AM

Topics:  

  • ICICI bank
  • Interest rate
  • RBI news
  • Repo Rate

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत
1

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत

ICICI बँकेने घेतला यू-टर्न, आता बचत खात्यात ५०,००० ऐवजी किमान ‘इतके’ पैसे ठेवावे लागतील
2

ICICI बँकेने घेतला यू-टर्न, आता बचत खात्यात ५०,००० ऐवजी किमान ‘इतके’ पैसे ठेवावे लागतील

काय आहे रिझर्व्ह बँकेचा रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्म? ट्रेझरी बिलांमध्ये सुरू करता येईल SIP
3

काय आहे रिझर्व्ह बँकेचा रिटेल डायरेक्ट प्लॅटफॉर्म? ट्रेझरी बिलांमध्ये सुरू करता येईल SIP

सामान्यांसाठी RBI च्या ३ मोठ्या घोषणा, जनधन री-केवायसीपासून ते गुंतवणूकीपर्यंत सर्व काही होईल सोपे
4

सामान्यांसाठी RBI च्या ३ मोठ्या घोषणा, जनधन री-केवायसीपासून ते गुंतवणूकीपर्यंत सर्व काही होईल सोपे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.