Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar On Delhi Elections: महाराष्ट्रानंतर ‘दादां’चे लक्ष्य दिल्ली विधानसभा; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Delhi Assembly Elections: सध्या अजित पवार महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी आहेत. सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदावर कार्यरत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 17, 2025 | 10:04 PM
Ajit Pawar On Delhi Elections: महाराष्ट्रानंतर ‘दादां’चे लक्ष्य दिल्ली विधानसभा; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली:  दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदानो होणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे.  दरम्यान महराष्ट्र विधानसभेत मोठे यश प्राप्त केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले उमेदवार दिल्ली निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे . सध्या अजित पवार महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी आहेत. सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदावर कार्यरत आहेत. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवार हे भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी मोठे यश प्राप्त केले आहे. आता त्यांनी दिल्ली विधानसभेसाठी कंबर कसली आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपले 30 उमेदवार उभे केले आहेत. वी दिल्ली, करावल नगर, कालकाजी या हाय प्रोफाइल जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. पक्षाने नवी दिल्ली मतदारसंघातून विश्वनाथ अग्रवाल, कालकाजी मतदारसंघातून जमील आणि करावल नगर मतदारसंघातून संजय मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांना आपला राष्ट्रवादी कॉँग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून निर्माण करायचा आहे . त्यादृष्टीने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

NCP ने आगामी #DelhiElection2025 के लिए 30 उम्मीदवारों की सूची जारी की। pic.twitter.com/kSBxBGCM7D — ANI_HindiNews (@AHindinews) January 17, 2025

भाजपने प्रसिद्ध केला जाहीरनामा 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यातील पहिला भाग भाजपने जाहीर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ने जाहीरनामा प्रसिद्ध केला. आमची सत्ता आल्यास सध्या सुरू असलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत, अंतर त्यातील भ्रष्टाचार संपवला जाईल असे नड्डा म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात कोकोणती आश्वासने दिली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा: BJP Delhi Manifesto: महिलांना दरमहा 2,500 तर, सणासुदीमध्ये…; दिल्ली जिंकण्यासाठी भाजपच्या जाहीरनाम्यात काय?

कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपने देखील दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन दिले आहे. तसेच होळी आणि दिवाळीत एक सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. दिल्लीत भाजप सरकार सत्तेत आल्यावर गर्भवती महिलांना २१,००० रुपये एकरकमी दिले जातील आणि पोषण आहार देखील दिला जाईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.दिल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 2 ते अडीच हजार पेन्शन दिली जाणार आहे. ७० वर्षांवरील व्यक्ती, विधवा आणि अपंगांना ३,००० रुपये मिळणार आहेत. यामध्ये ५०० रुपयांची वाढ देण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांचे मतदान आपल्या पक्षाच्या बाजूने वाढवण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: After maharashtra elections dcm ajit pawar ncp party 30 candidates for delhi assembly electionss 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 10:03 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
1

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.