Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar : अजित पवार यांच्या निधनाची सीबीआय चौकशी करावी आणि पुणे रिंग रोडला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुण्यतिथीला आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 15, 2026 | 08:00 PM
Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • निधनाची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी
  • पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर
 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे रिंग रोडला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, तसेच त्यांच्या निधनाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असताना रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या मागण्या मांडल्या. अमित शाह सोमवारी पुणे जिल्हा परिषद कार्यालयात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अजित पवार यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील नेत्यांचे त्यांनी आभारही मानले.

मात्र, अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये मंत्रिपदाचा लाभ घेतलेल्या नेत्यांनी पुणे रिंग रोडला त्यांचे नाव देण्याची मागणी का करू नये, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांचे अमूल्य योगदान आहे.
त्यांनी दशकाहून अधिक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले. असे असतानाही राज्यातील एखाद्या मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याबाबत काही जणांची भूमिका काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केवळ पुतळ्याचे अनावरण पुरेसे नाही!

अजित पवार यांच्या कार्याची दखल केवळ पुतळ्याच्या अनावरणापुरती मर्यादित ठेवू नये, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. पुणे रिंग रोडला अजित पवार यांचे नाव देण्याची घोषणा अमित शाह यांनी करावी. त्याचबरोबर अजित पवार यांच्या निधनाची सीबीआय चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

10 स्वीकृत नगरसेवकांचा तिढा शुक्रवारी सुटणार? भाजपच्या सात जागांसाठी दीडशेहून अधिक इच्छुक

पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा

या मागण्या मान्य न झाल्यास अजित पवार यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुणे रिंग रोडला त्यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. अजित पवार यांचा मृत्यू अपघात होता की त्यामागे काही कटकारस्थान होते, याचे सत्य समोर आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याबाबत कोणत्या मागण्या केल्या आहेत?

    Ans: पुणे रिंग रोडला अजित पवार यांचे नाव द्यावे आणि त्यांच्या निधनाची सीबीआय चौकशी करावी, अशा दोन प्रमुख मागण्या रोहित पवार यांनी केल्या आहेत.

  • Que: रोहित पवार यांनी या मागण्या कोणाकडे केल्या आहेत?

    Ans: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांनी या मागण्या केल्या आहेत.

  • Que: अमित शाह पुणे दौऱ्यात कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत?

    Ans: अमित शाह पुणे जिल्हा परिषद कार्यालयात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

Web Title: Rohit pawar demands ajit pawar name pune ring road cbi probe rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • ajit pawar
  • MLA Rohit Pawar
  • MP Sharad pawar

संबंधित बातम्या

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं
1

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

NCP News : ‘समोर दिसलात तर तोंड काळं करू’, कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक! रामदास कदमांच्या प्रतिमेला चपलांनी मारले
2

NCP News : ‘समोर दिसलात तर तोंड काळं करू’, कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक! रामदास कदमांच्या प्रतिमेला चपलांनी मारले

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
3

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच संजय काकडेंचे मोठे विधान; म्हणाले, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे…
4

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच संजय काकडेंचे मोठे विधान; म्हणाले, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.