दिल्ली विधानसभेसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध (फोटो- सोशल मिडिया)
Delhi Assembly Elections: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदानो होणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यातील पहिला भाग भाजपने जाहीर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ने जाहीरनामा प्रसिद्ध केला. आमची सत्ता आल्यास सध्या सुरू असलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत, अंतर त्यातील भ्रष्टाचार संपवला जाईल असे नड्डा म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात कोकोणती आश्वासने दिली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपने देखील दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन दिले आहे. तसेच होळी आणि दिवाळीत एक सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. दिल्लीत भाजप सरकार सत्तेत आल्यावर गर्भवती महिलांना २१,००० रुपये एकरकमी दिले जातील आणि पोषण आहार देखील दिला जाईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.
भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री @JPNadda जी दिल्ली विधानसभा चुनाव-2025 के लिए भाजपा के संकल्प पत्र भाग-1 का शुभारंभ कर रहे हैं।#BJPKeSankalp https://t.co/tJrfI1bpXh
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 17, 2025
दिल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 2 ते अडीच हजार पेन्शन दिली जाणार आहे. ७० वर्षांवरील व्यक्ती, विधवा आणि अपंगांना ३,००० रुपये मिळणार आहेत. यामध्ये ५०० रुपयांची वाढ देण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांचे मतदान आपल्या पक्षाच्या बाजूने वाढवण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत.
Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. प्रचार सभांमध्ये भाजप विरोधी आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत दिसून येत आहे. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक घोषित करू शकते. फेब्रुवारीत निवडणूक होऊ शकते. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता फलोदी सट्टा बाजारने देखील आपला अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप
काय आहे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज?
लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराची भविष्यवाणी खरी ठरल्यास यंदा दिल्लीमध्ये चित्र संपूर्णपणे बदलले दिसू शकते. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार काहीसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. तर भाजप हा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र जराही काही इकडे तिकडे झाल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. अर्थात फलोदी सट्टा बाजाराने हे अंदाज वर्तवले आहेत. नक्की काय निकल येणार हे निवडणुकीतच कळणार आहे.