Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

जर मते मिळवण्याची प्रक्रिया असेल तर मते रद्द करण्याची देखील प्रक्रिया आहे, आमची मागणी अशी आहे की एका जिल्हा दंडाधिकाऱ्याला निलंबित करा आणि संपूर्ण देशात एकही मत रद्द होणार नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 18, 2025 | 02:34 PM
Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले
Follow Us
Close
Follow Us:
  • उत्तर प्रदेशात मतचोरी
  • अखिलेश यादवांनी दाखवल्या आयोगाच्या पोचपावत्या
  • मतदारयादीतून मागासवर्गीयांची मते कापली

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांनंतर राजकारण चांगलच तापलं आहे. तर निवडणूक आयोगानेदेखील पत्रकार परिषद घेत मतचोरीच पुरावे द्यावेत अन्यथा राहुल गांधी यांनी माफी मागावी, असा इशारा दिला आहे. आयोगाच्या या इशाऱ्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी त्यांचा मोबाईलमधील काही पोचपावत्या दाखवत आपण निवडणूक आयोगाकडे प्रिंटआऊट घेऊन येत असल्याचे म्हटले आहे.

याशिवाय समाजवादी पक्षाने निवडणूक आयुक्तांना एक इमेल पाठवत उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदारांची मते कापली जात असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीसोबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्रही पाठवले आहे. राहुल गांधींच्या आरोपांनंतर समाजवादी पक्षानेही निवडणूक आयोगावर टीका करत आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. “समाजवादी पक्षने दिलेले प्रतिज्ञापत्र आम्हाला मिळाले नसल्याचा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे. पण त्यांनी आमच्या प्रतिज्ञापत्राच्या पावतीचा पुरावा म्हणून दिलेली त्यांच्या कार्यालयाची पावतीही पाहावी, आमची मागणी आहे की, निवडणूक आयोगाने आम्हाला पाठवलेली डिजिटल पावती बरोबर असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे, अन्यथा ‘निवडणूक आयोगा’सोबत ‘डिजिटल इंडिया’ देखील संशयाच्या भोवऱ्यात येईल.” त्याचवेळी त्यांनी पोस्टमध्ये आयोगाकडून मिळालेल्या काही पोचपावत्यांच्या स्क्रिनशॉटही जोडला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

यासोबतच अखिलेश म्हणाले की, ‘आमची मागणी अशी आहे की जातीच्या आधारावर बीएलओ नियुक्त करू नका, उत्तर प्रदेशचा डेटा मिळवा, ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत निवडणूक घेतली जाते त्या अधिकाऱ्यामध्ये एकही पीडीए अधिकारी असेल तर मला सांगा. भाजप सरकार आल्यापासून, तक्रारीवरून एकाही अधिकाऱ्याला काढून टाकले गेले असेल तर मला सांगा, याचा अर्थ निवडणूक आयोग भाजपचे जास्त ऐकतो.

“जर मते मिळवण्याची प्रक्रिया असेल तर मते रद्द करण्याची देखील प्रक्रिया आहे, आमची मागणी अशी आहे की एका जिल्हा दंडाधिकाऱ्याला निलंबित करा आणि संपूर्ण देशात एकही मत रद्द होणार नाही. जर २०१९, २२, २४ मध्ये एकाही अधिकाऱ्याला काढून टाकण्यात आले असेल तर मला सांगा. अखिलेश म्हणाले की त्यांनी जाणूनबुजून मागासवर्गीयांची मते कापली आहेत, बिंद, मौर्य, पाल, राठोड समुदाय हे सर्व यामध्ये समाविष्ट आहेत आणि ते दाखवतात की त्यांना मागासवर्गीयांची मते मिळत आहेत. त्यांनी मागासवर्गीयांची मते यादीतून कापली आणि तुम्ही निवडणूक जिंकता. सत्य हे आहे की त्यांची मते वगळली जात आहेत.

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास

यापूर्वी रविवारी अखिलेश म्हणाले होते की, “उत्तर प्रदेशात सपाने दिलेले प्रतिज्ञापत्र मिळाले नसल्याचा दावा करणाऱ्या आयोगाने त्या प्रतिज्ञापत्रांच्या पावत्या पहाव्यात. ‘उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने दिलेले शपथपत्र आम्हाला मिळालेले नाही असे म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाने आमच्या शपथपत्रांच्या पावतीचा पुरावा म्हणून दिलेल्या त्यांच्या कार्यालयाच्या पावत्या पहाव्यात.’ यादव यांनी यापूर्वी ‘X’ वर दुसऱ्या पोस्टमद्ये , सपाने आयोगाला ‘मत लुटण्याचे’ १८ हजार शपथपत्र दिले होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा केला होता.

जो चुनाव आयोग ये कह रहा है कि हमें यूपी में समाजवादी पार्टी द्वारा दिये गये ऐफ़िडेविट नहीं मिले हैं, वो हमारे शपथपत्रों की प्राप्ति के प्रमाण स्वरूप दी गयी अपने कार्यालय की पावती को देख ले। इस बार हम मांग करते हैं कि चुनाव आयोग शपथपत्र दे कि ये जो डिजिटल रसीद हमको भेजी गयी है वो… pic.twitter.com/9A4njvF9Tw — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 17, 2025

 

चिट्ठा लंबा होता जा रहा है जिनकी करतूतों-कारनामों का
उनका जवाब भी न आया अब तक हमारे ‘हलफ़नामों’ का pic.twitter.com/QSFCEHhU5j
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 17, 2025

 

Web Title: After the allegations akhilesh yadav showed the commission direct evidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Akhilesh yadav
  • election commission of india
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट का ब्लॉक करण्यात आले? सरकार आणि समाजवादी पक्षात नेमका वाद काय?
1

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट का ब्लॉक करण्यात आले? सरकार आणि समाजवादी पक्षात नेमका वाद काय?

Election Commission: तुमच्याकडे मतदानकार्ड नाही का? चिंता सोडा, निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर
2

Election Commission: तुमच्याकडे मतदानकार्ड नाही का? चिंता सोडा, निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
3

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; निवडणूक आयोगाने उचलले मोठा निर्णय
4

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; निवडणूक आयोगाने उचलले मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.