Ahmedabad Plane Crash: फ्युएल स्विच बंद असल्याने प्लेन थेट....; रिपोर्टमधून समोर आला धक्कादायक खुलासा
अहमदाबाद: गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेताच काही मिनिटांनी हे विमान एका मेडिकल कॉलेजवर कोसळले. या दुर्घटनेत २४२ पैकी २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक प्रवाशी सुदैवाने बचावला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. लवकरच प्राथमिक तपासणीचा अहवाल समोर येणार आहे. मात्र अमेरिकेतील एका मीडिया अहवालात मोठी शंका उपस्थित करण्यात आली आहे. याबाबत जाणून घेऊयात.
अमेरिकेतील मीडिया संस्था असणाऱ्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालानुसार, अपघातग्रस्त झालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये फ्युएल सप्लाय नियंत्रित करणारे स्विच बंद करण्यात आले होते. यामुळे विमानाने उड्डाण करताच त्यातील थ्रस्ट बंद झाला विमान खाली येऊ लागले. थ्रस्ट हे विमानातील महत्वाची गोष्ट समजली जाते, जी विमानाला उड्डाण करताना मदत करते.
आतापर्यंत झालेल्या तपासात याबाबत माहिती समोर आलेली नाही. किंवा तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले नाही.ज्यामध्ये स्विच बंद करण्याबाबत सांगितले जात आहे. पायलट या स्विचचा वापर विमान सुरु करणे, बंद करणे किंवा अत्यावश्यक वेळेत करत असतात. भारतातील यंत्रणांचा तपास अहवाल समोर येण्याआधीच अमेरिकेन मीडियाचा हा अहवाल समोर आल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणातील प्राथमिक अहवाल सादर
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. ही माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. मात्र, अहवालातील निष्कर्ष अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत.
या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत असून संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच मेघनानगरमधील एका वसतिगृह संकुलावर कोसळले. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि जमिनीवरचे काही नागरिक मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली होती. केंद्र सरकारने तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
Bihar Election: बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी खेळला मोठा डाव; सरकारी नोकरीत महिलांना थेट…
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आला असून त्यातील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) २५ जून २०२५ रोजी AAIBच्या प्रयोगशाळेत उघडण्यात आले. या मॉड्यूलमधून महत्त्वपूर्ण फ्लाइट डेटा आणि संवाद नोंदी यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आल्या आहेत. या डेटाच्या आधारे अपघाताचे नेमके कारण – तांत्रिक बिघाड की मानवी चूक – हे निश्चित करण्यात येणार आहे. एक प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.