बिहारमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण (फोटो- ani)
पाटणा: बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. वर्षाअखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नितीश कुमार, भाजप आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काहीही करून बिहार जिंकायचे असे भाजप आणि जेडीयूचे लक्ष्य आहे. तर सत्ताधारी पक्षाला विरोधात बसवायचे असे विरोधकांचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.
बिहारमध्ये आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्य मंत्रीमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. बिहारच्या मूळ रहिवाशी असलेल्या महिलांना रंजीतील सर्व सरकारी नोकरी, संवर्ग आणि पदांवर थेट नियुक्तीमध्ये 35 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. हे आरक्षण सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू असणार आहे. तसेच नितीश कुमार यांनी बिहार राज्य युवा आयोगाच्या स्थापनेला देखील मंजूरी दिली आहे.
पटणा येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये हा निनरया मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. या बैठकीत 43 गोष्टींना मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत माहिती देत आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री नितीश कुमार?
बिहारमधील युवकांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून देण्यासाठी त्यांना सशक्त करण्यासाठी बिहार युवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुझे यह बताते हुए प्रसन्नता हो रही है कि बिहार के युवाओं को अधिक से अधिक रोजगार के अवसर उपलब्ध कराने, उन्हें प्रशिक्षित करने तथा सशक्त और सक्षम बनाने के उद्देश्य से राज्य सरकार ने बिहार युवा आयोग के गठन का निर्णय लिया है और आज कैबिनेट द्वारा बिहार युवा आयोग के गठन की मंजूरी भी दे…
— Nitish Kumar (@NitishKumar) July 8, 2025
बिहारमध्ये मतदारयादीत मोठे फेरफार
बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. या निवडणुकांच्य पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सध्या ‘विशेष गहन पुनरावलोकन’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रिया सुरू आहे. पण या प्रक्रियेवरच विरोधी इंडिया आघाडीने विरोध केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या प्रक्रियेविरोधात विरोधी पक्षांच्या संयुक्त प्रतिनिधीमंडळाने बुधवारी (२ जुलै) केंद्रीय निवडणूक आयोगाची भेटीची वेळ मागितली होती. पण सुरूवातील आयोगाने इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळास वेळ देण्यास नकार दिला. या नकारानंतर विरोधी पक्षांकडून दबाव आल्याने निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना भेटीची वेळ निश्चित केली. निवडणूक आयोगाच्या भेटीत इंडिया आघाडीच्या ११ पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली.
Bihar Elections 2025: मतदारयादीत मोठे फेरफार.’; इंडिया आघाडी शिष्टमंडळाची आयोगाच्या कारभारावर टीका
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्विटर एक्सवर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या वर्तवणूकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “काल संध्याकाळी, इंडिया ब्लॉकच्या एका शिष्टमंडळाने बिहारच्या विशेष मतदार सघन सुधारणा (“SIR”) संदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुरुवातीला आयोगाने भेटण्यास नकार दिला, परंतु अखेर दबावाखाली शिष्टमंडळाला बोलावण्यात आले. पण त्यातही आयोगाने मनमानीपणे प्रत्येक पक्षाच्या फक्त दोन प्रतिनिधींना परवानगी दिली, ज्यामुळे आमच्यापैकी बरेच जण आयोगाला भेटू शकले नाहीत. मी स्वतः सुमारे दोन तास वेटिंग रूममध्ये बसलो.