कोझिकोड एअरपोर्टवरून दोहा (कतार० ला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एअर इंडिया चर्चेत आली आहे. दोहाला जाणारे एअर इंडियाचे विमान काही कारणाने पुन्हा एकदा कोझिकोड एअरपोर्टवर उतरवण्यात आले आहे. हे एअर इंडियाचे बोईंग ७३७ विमान होते. या विमानाने दोहाला जाण्यासाठी उड्डाण घेतले आणि काही कालावधीतच हे विमान पुन्हा कोझिकोड एअरपोर्टवर उतरवण्यात आले.
दोहा येथे जाणारे एअर इंडियाचे विमान हे तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा कोझिकोड एअरपोर्टवर उतरवण्यात आल्याचे समजते आहे. या विमानातील प्रवाशाना दोहा येथे जाण्यासाठी दुसऱ्या विमानाची सोया उपलब्ध करून देण्यात आली. सुरक्षेच्या कारणांमुळे हे विमानपुन्हा कोझिकोड विमानतळावर उतरवण्यात आले आहे.
तांत्रिक बिघाड झाल्याने दोहा येथे जाणारे विमान पुन्हा कोझिकोड एअरपोर्टवर परतले आहे. प्रवाशांची काळजी घेण्याच्या दृष्टिने त्यांना दोहा येथे जाण्यासाठी दुसरे विमान उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच झालेल्या असुविधेमुळे त्यांना रिफ्रेशमेंट देखील देण्यात आली आहे. त्यानंतर दुसरे विमान त्यांना घेऊन दोहाला रवाना झाले आहे. प्रवाशांच्या असुविधेसाठी आम्हाला खेद आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
एअर इंडियासाठी हा गेला आठवडा जरा अवघड गेला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र घडलेल्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुखकारक चित्र आहे. अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले होते. यामध्ये २४१ पैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एअर इंडियाच्या अनेक विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
Air India : साडेसाती संपेना! मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले, टायर फुटले; इंजिनलाही नुकसान
एअर इंडियाच्या विमानाच्या तक्रारी
गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत. अनेक विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हॉंगकॉंगवरून दिल्लीला जाणारे विमान, दिल्ली ते कोलकाता, कोचीन ते मुंबई विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाड आणि अन्य कारणांमुळे हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले
कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान सोमवारी (21 जुलै) सकाळी लँडिंग दरम्यान घसरले. मुंबईत मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आणि लँडिंग दरम्यान विमान घसरले. यामुळे विमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि त्याचे तीन टायर फुटले. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हा अपघात खराब हवामानामुळे झाला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमानाचे तीन टायर फुटले आणि विमानाच्या इंजिनला नुकसानही झाले. मात्र पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत विमान कंट्रोल केलं, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.