मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले (फोटो सौजन्य-X)
Air India Plane News Marathi: काही दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जात होते. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच विमान कोसळले. हे विमान लोकवस्ती असलेल्या मेडीकल कॉलेजच्या एका मेसवर पडलं. ज्यात विमानातील प्रवाशी, केबीन क्रू आणि मेसमध्ये जेवण करणारे काही विद्यार्थी असे मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. अपघताची ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आहे.
कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान सोमवारी (21 जुलै) सकाळी लँडिंग दरम्यान घसरले. मुंबईत मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आणि लँडिंग दरम्यान विमान घसरले. यामुळे विमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि त्याचे तीन टायर फुटले. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हा अपघात खराब हवामानामुळे झाला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमानाचे तीन टायर फुटले आणि विमानाच्या इंजिनला नुकसानही झाले. मात्र पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत विमान कंट्रोल केलं, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.
याप्रकरणी एअर इंडियाने एक निवेदन देखील जारी केले आहे. एअरलाइन कंपनीने म्हटले आहे की, ‘२१ जुलै २०२५ रोजी कोचीहून मुंबईला जाणारे विमान AI2744 लँडिंग दरम्यान घसरले. याचे कारण म्हणजे मुसळधार पावसामुळे घसरले झालेली. विमान सुरक्षित गेटवर उतरले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरळीतपणे उतरले. सध्या विमानाला तपासणीसाठी हवाई प्रवासातून काढून टाकण्यात आले आहे. प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.’ या घटनेमुळे विमानतळावर काही काळ गोंधळ उडाला. विमानतळ प्रशासनाने आपत्कालीन प्रतिसाद पथकालाही बोलावले.
छत्रपती शिवाजी विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही घटना सकाळी ९:२७ वाजता घडली. धावपट्टीवरील या घटनेनंतर लगेचच आपत्कालीन पथक सक्रिय करण्यात आले आणि परिस्थिती हाताळण्यात आली. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. विमानतळाच्या धावपट्टीला थोडे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, दुसरी धावपट्टी त्वरित सक्रिय करण्यात आली आहे. ०९/२७ हा मुंबई विमानतळाचा मुख्य धावपट्टी आहे. आता १४/३२ त्याच्या जागी सक्रिय करण्यात आला आहे. सध्या, विमान उड्डाण सेवांमधून काढून टाकण्यात आले आहे आणि त्याची तपासणी केली जात आहे. संपूर्ण तपासणीनंतरच ते परत आणले जाईल.