
Akhilesh Yadav meet Avimukteshwaranand uttar pradesh political news
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राजधानी लखनऊमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची भेट घेतली. मात्र या भेटीचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे देखील समोर आलेले नाही. ही भेट आध्यात्मिक भेट होती की राजकीय भेट होती याची दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरु आहे.
हे देखील वाचा : अविश्वास ठराव नामंजूर; ओम बिरला पुन्हा सन्मानाने परतले लोकसभेत, विरोधकांना सुनावले खडेबोल
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. तसेच जानेवारी २०२६ मध्ये प्रयागराजमध्ये माघ मेळा दरम्यान प्रशासन आणि पोलिसांशी झालेल्या वादानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शंकराचार्य यांची भेट घेतल्याचे देखील दिसून आले होते. याच मुद्द्यावर अखिलेश यादव यांनी भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांची ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.
जिनके ध्यान मात्र से मिलता आशीर्वाद है
उनके साक्षात् दर्शन का मिला सौभाग्य है! सच्चे संत का सम्मान ही सनातन का सम्मान है। pic.twitter.com/zV3tQrArRX — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 12, 2026
राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की अखिलेश यादव यांची शंकराचार्यांशी झालेल्या भेटीमुळे या मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण आणखी तापू शकते.समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी (दि.12) खनऊमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची भेट घेतली. अखिलेश यादव यांनी हात जोडून दारात उपस्थित संतांचे स्वागत केले. माजी खासदार अनु टंडन देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.
हे देखील वाचा : विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या गौरक्षण यात्रेला सुरुवात
मीडिया रिपोर्टनुसार, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी ७ मार्च रोजी वाराणसी येथून आपला प्रवास सुरू केला. चार दिवस चाललेला हा प्रवास जौनपूर, सुलतानपूर आणि सीतापूरमधून गेला आणि १० मार्च रोजी लखनऊला पोहोचला. लखनऊमध्ये आल्यानंतर त्यांनी बुधवारी गोरक्षण मोहिमेची सुरुवात केली. शंकराचार्य सध्या कृष्णा नगर परिसरात राहत आहेत, जिथे विविध राजकीय आणि सामाजिक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी येत आहेत.