
India Politics: "एक-एक घुसखोराला हाकलवून..."; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर प्रहार
अमित शहा पश्चिम बंगाल दौऱ्यावर
बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार
तृणमूल कॉँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत
येणाऱ्या नवीन वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. येणारी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये विकासाचा प्रवाह वाहेल असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच त्यांनी विद्यमान सरकारवर देखील टीका केली आहे.
काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये विकासाची लाट येईल. कारण गेली 15 वर्षे येथील नागरिक तृणमूल कॉँग्रेसच्या सत्तेत भीतीमध्ये जगत आहेत. बंगालमध्ये घुसखोरी रोखण्यात ममता बॅनर्जी यांचे सरकार अपयशी ठरले आहे. घुसखोरांना रोखण्याचे काम केकवळ भाजपा सरकारच करू शकते. भाजपच्या सतेत कोणी चुकीचे काम करू शकणार नाही. एक – एक घुसखोराला बाहेर हाकलावून दिले जाईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या काळात ते अनेक ठिकाणी भेटी देणार आहेत. महत्वाच्या नेत्यांच्या बैठका करणार आहेत. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार देशातील गरीबी हटवण्यासाठी काम करत असताना पश्चिम बंगालमध्ये विकास थांबला आहे.
ममता सरकार कोसळणार? ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केली भीती; पश्चिम बंगालसाठी आरपारची लढाई
आगामी विधानसभा निवडणूक भाजप जिंकेल आणि मोठ्या बहुमताने सरकार स्थापन करेल. बंगालमधील जनता घुसखोरीमुळे त्रस्त आहे. घुसखोरी का केवळ पश्चिम बंगालची समस्या नसून संपूर्ण देशातील आहे. ही समस्या केवळ राष्ट्रवादी सरकारच पूर्ण करू शकेल.
अमित शाह यांचा आसाममधून घणाघात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आसाममधील नागाव येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि घुसखोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षावरही हल्ला चढवला. शहा म्हणाले की, मोदी सरकारने आसामच्या विकासावर १५ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. ११ वर्षांपासून विकासकाम सुरू आहे, परंतु काँग्रेस पक्षाने कधीही आसामचा विकास केला नाही. अमित शहा पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने घुसखोरांना देशात स्थायिक होऊ दिले.
घुसखोरांविरुद्ध कारवाई करणे हे मोदी सरकारचे प्राधान्य आहे. मोदी सरकारने ईशान्येकडील शांतता सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत, अतिरेकी संघटनांशी शांतता करार केले आहेत. घुसखोरांना हाकलून लावले जात आहे. शाह म्हणाले की, घुसखोरांना संपूर्ण देशातून हाकलून लावले जाईल.