केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान (Photo Credit - X)
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल, असे मोठे विधान केले आहे. ते एसपीएमआरएफने आयोजित केलेल्या ‘भारत मंथन २०२५ – नक्षलमुक्त भारत’ कार्यक्रमात बोलत होते. केवळ सशस्त्र नक्षलवाद्यांना संपवून नक्षलवादाचा अंत होणार नाही, तर या विचारधारेला वैचारिक, कायदेशीर आणि आर्थिक पाठिंबा देणाऱ्यांनाही परत आणावे लागेल, असे शहा म्हणाले.
अमित शहा यांनी नक्षलवादाला वैचारिक पाठिंबा देणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला. “अलीकडेच गोंधळ पसरवण्यासाठी एक पत्र लिहिले गेले होते, ज्यामध्ये युद्धबंदी जाहीर करावी आणि आम्हाला आत्मसमर्पण करायचे आहे असे म्हटले होते,” असे शहा म्हणाले. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिले, “युद्धबंदी होणार नाही. तुम्हाला आत्मसमर्पण करायचे असेल तर शस्त्रे खाली ठेवा. पोलीस एकही गोळी झाडणार नाही.”
#WATCH | Delhi: Union Home Minister Amit Shah says, “…This country will be free of Naxalism by March 31, 2026. Many people believe that the Naxalite problem will end with the end of armed activities. But this is not the case. Why did the Naxalite problem arise, grow, and… pic.twitter.com/01NhShHMWg — ANI (@ANI) September 28, 2025
शहा यांनी ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’चा उल्लेख करत डाव्या विचारसरणीच्या पक्षांवर टीका केली. ते म्हणाले की, हे सर्व पक्ष सार्वजनिकरित्या डाव्या हिंसाचारापासून स्वतःला दूर ठेवतात, परंतु ऑपरेशन सुरू होताच त्यांची सहानुभूती उघड झाली. त्यांनी पत्रे आणि प्रेस नोट्स लिहून ऑपरेशन थांबवण्याची मागणी केली. या लोकांना नक्षलवाद्यांचे संरक्षण करण्याची गरज का आहे, असा सवालही शहांनी विचारला.
गृहमंत्री अमित शहा यांनी मानवाधिकार संस्था आणि विचारवंतांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पीडित आदिवासींच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी या स्वयंसेवी संस्था पुढे का येत नाहीत? लांबलचक लेख लिहिणारे हे सर्व लोक आदिवासी पीडितांसाठी कधी लेख लिहितात का? त्यांना काळजी का नाही?” असे विचारत, त्यांनी त्यांची सहानुभूती ‘निवडक’ असल्याचा आरोप केला.
Devendra Fadnavis: आता शहरी नक्षलवाद खिळखिळा होणार! विधानसभेत ‘जनसुरक्षा विधेयक’ मंजूर
नक्षलवादाची सुरुवात विकासाच्या अभावामुळे झाली, असे म्हणणाऱ्यांना अमित शहा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “डाव्या विचारसरणीचा अतिरेक विकासामुळे सुरू झाला नाही. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकांमुळे विकास थांबला.” आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी आकडेवारी दिली. २०१४ ते २०२५ या काळात नक्षलग्रस्त भागात १२,००० किलोमीटर रस्ते बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.