Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: “मी बोलतोय ना, पंतप्रधान आले तर…”; गोंधळ घालणाऱ्या विरोधकांविरुद्ध अमित शहा कडाडले

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर बोलण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्याला अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2025 | 09:06 PM
Operation Sindoor: "मी बोलतोय ना, पंतप्रधान आले तर..."; गोंधळ घालणाऱ्या विरोधकांविरुद्ध अमित शहा कडाडले

Operation Sindoor: "मी बोलतोय ना, पंतप्रधान आले तर..."; गोंधळ घालणाऱ्या विरोधकांविरुद्ध अमित शहा कडाडले

Follow Us
Close
Follow Us:

१. राज्यसभेत अमित शाह आक्रमक
२. ऑपरेशन सिंदूरवरून शहा यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
३. चर्चा होणार हे ठरले मात्र उत्तर कोण देणार हे सरकार ठरवते असे शाह म्हणाले.

Amit Shah/operation Sindoor:  संसदेत आज देखील ऑपरेशन सिंदूरवर चर्चा पार पडली. अमित शाह यांनी राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर विरोधकांच्या मुद्द्यांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी सभागृहात बोलणाऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत बोलण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी अमित शाह नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर बोलण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावे अशी मागणी केली. यावेळी बोलताना अमित शाह विरोधकांना टोला हाणत म्हणाले, “तुम्ही आधी माझ्याशीच बोला, पंतप्रधानांना कशाला बोलावताय?”

Replying at the Rajya Sabha during Special Discussion on India’s powerful response to terrorism through 'Operation Sindoor'. https://t.co/UqdoEtNz2n

— Amit Shah (@AmitShah) July 30, 2025

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, “तुम्ही पंतप्रधानांना बोलावले तुम्हालाच त्रास होईल. तुम्ही अजूनही संतुष्ट नाही का, जे पंतप्रधानांना बोलवत आहात.” मात्र अमित शाह यांच्या बोलण्यानंतर देखील विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घालणे सुरूच ठेवले. त्यामुळे सभापती यांनी विरोधकांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली. तुम्ही दहशतवादी रोखण्यासाठी इतके वर्ष काही केले नाही, त्यामुळे तुम्हाला माझे बोलणे ऐकायचे नाहीये. दोन्ही सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल हे बैठकीत ठरले होते. मात्र उत्तर कोण देणार हे सरकारद्वारे ठरवले जाते:”, असे अमित शाह म्हणाले.

जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

राज्यसभेत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले, “आपल्याला त्यांची (काँग्रेसच्या तत्कालीन सरकारची) तुष्टीकरणाची भावना समजून घेणे आवश्यक आहे. २००८ मध्ये इंडियन मुजाउद्दीनद्वारे जयपूरमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध व्हावेत यासाठी प्रत्यन झाले. ते आमच्यावर ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही त्यांना बिर्याणी घालायला गेलो.”

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

पुढे बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले, “त्यांच्या सरकारच्या काळात आपल्याकडे लष्करी शक्ती होती. मात्र त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नव्हती. २००९ मध्ये एससीओ शिखर संमेलनात २००८ च्या हल्ल्याचा साधा उल्लेख झाला नाही. तत्कालीन सरकारने २००५ च्या दिल्ली सिरीयल बॉम्बस्फोट, २००६ च्या वाराणसी दहशतवादी हल्ला, २००६ च्या मुंबई ट्रेनमधील बॉम्ब स्फोट याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.”

 

Web Title: Amit shah reply to india alliance operation sindoor in rajysabha pm modi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 08:50 PM

Topics:  

  • Amit Shah
  • INDIA Alliance
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड
1

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक
2

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
3

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध
4

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.