Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंध्र प्रदेशात ‘अर्णब’चा तडाखा; लाखोंना फटका, किनारपट्टीवरही मोठे नुकसान

वादळामुळे लाखो लोकांना फटका बसला असून, किनारपट्टीच्या भागांत मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान ताशी १२५ ते १३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. किनाऱ्यावर धडकल्यानंतरही वादळाची तीव्रता कायम राहिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 29, 2026 | 01:16 PM
आंध्र प्रदेशात 'अर्णब'चा तडाखा; लाखोंना फटका, किनारपट्टीवर मोठे नुकसान

आंध्र प्रदेशात 'अर्णब'चा तडाखा; लाखोंना फटका, किनारपट्टीवर मोठे नुकसान

Follow Us
Follow Us:
  • आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘अर्णब’ चक्रीवादळाचा तडाखा.
  • वादळाशी संबंधित घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू.
  • बुधवारी मध्यरात्री १.२० वाजता धडकण्याची प्रक्रिया सुरू.
अमरावती : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ शक्तिशाली चक्रीवादळ धडकले. वादळाशी संबंधित विविध घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. भारतीय हवामान विभागानुसार, बुधवारी मध्यरात्री सुमारे १.२० वाजता चक्रीवादळाच्या जमिनीवर धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली. बापटला ते विशाखापट्टणमदरम्यान, यानमच्या दक्षिणेला काकीनाडाजवळ हे वादळ किनाऱ्यावर आले.

वादळामुळे लाखो लोकांना फटका बसला असून, किनारपट्टीच्या भागांत मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान ताशी १२५ ते १३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. किनाऱ्यावर धडकल्यानंतरही वादळाची तीव्रता कायम राहिली. यामुळे आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची छपरे उडाली, झाडे उन्मळून पडली आणि सखल भागांत समुद्राचे पाणी शिरले. ओडिशाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू होता. वादळाची तीव्रता व वेग यामुळे बचावकार्यापुढे आव्हान उभे राहिले. मात्र, वेळेत केलेले स्थलांतर आणि आपत्ती व्यवस्थापनामुळे मोठ्या प्रमाणावरील जीवित व वित्तहानी टाळण्यास मदत झाली.

मागील चक्रीवादळांमधील अनुभव लक्षात घेऊन निवारा केंद्रे, वैद्यकीय सुविधा आणि संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली होती. तरीही झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि पूरस्थिती यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले. वादळ अंतर्गत भागांकडे सरकत असताना मुसळधार पाऊस, पडलेली झाडे, वीजवाहिन्यांचे नुकसान आणि ठिकठिकाणी साचलेले पाणी यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

चक्रीवादळाने ओलांडली आंध्र किनारपट्टी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णब’ चक्रीवादळ बुधवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. यामुळे मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली. उन्मळून पडलेली झाडे, कोसळलेले विजेचे खांब, उखडलेले रस्ते अशा विध्वंसाच्या खुणा मागे सोडत चक्रीवादळाने आंध्र किनारपट्टी ओलांडली. चक्रीवादळामुळे राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक घरांचे नुकसान झाले, असे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

FAQ

१. आंध्र प्रदेशात कोणते चक्रीवादळ धडकले?
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ ‘अर्णब’ चक्रीवादळाने धडक दिली.

२. चक्रीवादळामुळे किती जणांचा मृत्यू झाला?
वादळाशी संबंधित विविध घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला.

३. चक्रीवादळ जमिनीवर कधी धडकले?
भारतीय हवामान विभागानुसार, बुधवारी मध्यरात्री सुमारे १.२० वाजता चक्रीवादळाच्या जमिनीवर धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली.

Web Title: Arnab strikes andhra pradesh many people affected extensive damage along the coast nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • cyclone alert

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
1

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Andhra Pradesh : दसऱ्याच्या पारंपरिक लाठी-काठी युद्धाचा रक्तरंजित शेवट; एकाचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
2

Andhra Pradesh : दसऱ्याच्या पारंपरिक लाठी-काठी युद्धाचा रक्तरंजित शेवट; एकाचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.