Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andhra Pradesh : दसऱ्याच्या पारंपरिक लाठी-काठी युद्धाचा रक्तरंजित शेवट; एकाचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात दसऱ्यानिमित्त आयोजित देवरागाट्टू बन्नी उत्सवादरम्यान पारंपरिक लाठी-काठीच्या लढाईत एकाचा मृत्यू झाला आहे. तर यात १०० हून अधिक जण जखमी झाले. दहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 22, 2026 | 03:02 PM
Andhra Pradesh : दसऱ्याच्या पारंपरिक लाठी-काठी युद्धाचा रक्तरंजित शेवट; एकाचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

Andhra Pradesh : दसऱ्याच्या पारंपरिक लाठी-काठी युद्धाचा रक्तरंजित शेवट; एकाचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

Follow Us
Follow Us:
  • लाठ्या काठ्यांच्या युद्धाची परंपरा
  • जखमांना शुभ समजतात गावकरी
  • ही लढाई पाहण्यासाठी शेजारील राज्यातील भाविक येतात
आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) कुरनूल जिल्ह्यात दसरा उत्सवादरम्यान लाठी-काठीने लढण्याची एक पारंपारिक प्रथा आहे. दरम्यान, यंदा ही प्रथा एका व्यक्तीच्या जीवावर आली असून 100 पेक्षा जास्त जण यात जखमी झाले आहेत.
प्रत्येक वर्षाप्रमाणे बुधवारी रात्री होलगोंडा मंडळ (ब्लॉक)च्या देवरागाट्टू गावात आयोजित ‘देवरागाट्टू बन्नी उत्सवा’दरम्यान दोन गटांत एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला. यात अनेक जण जखमी झाले. जखमींना अडोनी आणि अलूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्यांना हलकी जखम झाली त्यांच्यावर प्रशासनाने रुग्णालयात उपचार करून घरी सोडले आहे. दरम्यान, या घटनेतील मृताची ओळख अलूरमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय पोताराजूच्या रुपात करण्यात आली आहे.

लाठ्या काठ्यांच्या युद्धाची परंपरा

लाठी युद्ध प्रत्येक वर्षी दसरा उत्सवाच्या निमित्ताने एका डोंगराळ ठिकाणी वसलेल्या मल्लेश्वर स्वामी मंदिरात आयोजित केले जाते. नेहमीप्रमाणे ग्रामस्थांनी पोलिसांच्या आदेशांना दुर्लक्ष करत याचे आयोजन केले होते. गावकऱ्यांच्या मते, हे त्यांच्या परंपरेचा भाग आहे.
या वार्षिक उत्सवाअंतर्गत वेगवेगळ्या गावातील लोकांचे दोन गट बनवले जातात. मध्यरात्री देवी मल्लम्मा आणि मल्लेश्वर स्वामी यांच्या प्रतिकात्मक विवाहानंतर दोन्ही गट देवी-देवतांच्या मुर्त्यांवर आपला अधिकार दाखवण्यासाठी लाठ्या काठ्यांनी लढाई करतात.

Belonging: A Journey of Love: इटलीतील बालपणापासून पंतप्रधानपदाच्या संधीपर्यंत; Sonia Gandhiनी शेअर केली आत्मचरित्राची पहिली झलक

जखमांना शुभ समजतात गावकरी

दोन्ही गटांनी पूर्ण उत्सफूर्तपणे या आयोजनात भाग घेतला. ही लढाई रोखण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केला, पण त्यांचे यात काहीच चालले नाही. नेरानी, नेरानी टांडा आणि कोथापेटा गावातील लोक एका गटात, तर अरिकेरा, अलूरू, सुलुवई, एलार्थी, निद्रावर्ती आणि बिलेहाल गावातील दुसरा गट यांच्यात तुफान हाणामारीला सुरुवात झाली.

दरम्यान, भक्त या जखमांना शुभ मानन्याची प्रथा आहे. दुसरीकडे, प्रशासनाच्या वतीने या लढाईच्या आयोजनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी जास्तीची कुमक मागवली जाते, पण ग्रामस्थ या आदेशाला पायदळी तुडवत याचे आयोजन करतातच. यावेळी येथे एक हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी येथे तैनात होते.

Ashutosh Ranka- Saurav Das Bail: CJP नेते आशुतोष रांका अन् सौरव दास यांना अखेर जामीन मंजूर

ग्रामस्थांच्या मते, भगवान शीवने भैरवनाथाचे रुप धारण केले होते आणि मणी तथा मल्लासुर नावाच्या दोन असुरांना लाठ्या काठ्यांनी तुडवलेले. त्याच प्रथेचे ग्रामस्थ विजयादशमीच्या दिवशी अवलोकन करतात. ‘राक्षस पक्षा’चा एक गट हा ‘देवता पक्षा’च्या गटाकडून देवांच्या मूर्ती हिसकावण्याचा प्रयत्न करतो. या मुर्त्या आपल्याकडे मिळाव्या म्हणून ते लाठ्या-काठ्यांचा वापर करतात.

ही पारंपारिक लढाई पाहण्यासाठी कुरनूलच्या जवळपासच्या जिल्ह्यातील, तेलंगाना आणि कर्नाटकसारख्या शेजारी राज्यातील हजारो लोक गावात जमा होतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आंध्र प्रदेशातील लाठी-काठीच्या लढाईत काय घडले?

    Ans: कुरनूल जिल्ह्यातील देवरागाट्टू गावात दसरा उत्सवादरम्यान झालेल्या पारंपरिक लाठी-काठीच्या लढाईत एकाचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले.

  • Que: देवरागाट्टू बन्नी उत्सव कुठे आयोजित केला जातो?

    Ans: आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील होलगोंडा मंडळातील देवरागाट्टू गावात हा उत्सव आयोजित केला जातो.

  • Que: देवरागाट्टू येथे लाठी-काठीची लढाई का होते?

    Ans: स्थानिक मान्यतेनुसार, भगवान शिवाने भैरवनाथाचे रूप धारण करून मणी आणि मल्लासुर या असुरांचा पराभव केला होता. या पौराणिक कथेशी संबंधित परंपरेचा भाग म्हणून विजयादशमीच्या दिवशी ही लढाई आयोजित केली जाते.

Web Title: Andhra pradesh dussehra lathi fight one dead over 100 injured rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Dasara Melava
  • Fights

संबंधित बातम्या

‘मिया मॅजिक’ चा कॅप्टन्सी स्वॅग! Mohammed Siraj च्या नेतृत्वात हैदराबादचा कहर; सलग दुसरा दणदणीत विजय
1

‘मिया मॅजिक’ चा कॅप्टन्सी स्वॅग! Mohammed Siraj च्या नेतृत्वात हैदराबादचा कहर; सलग दुसरा दणदणीत विजय

BJP-RSS Internal Politics: भाजप आणि आरएसएसमध्ये अंतर्गत धुसफूस; जगदीप धनखड यांना व्यासपीठावर स्थान देण्यामागे नेमका उद्देश काय?
2

BJP-RSS Internal Politics: भाजप आणि आरएसएसमध्ये अंतर्गत धुसफूस; जगदीप धनखड यांना व्यासपीठावर स्थान देण्यामागे नेमका उद्देश काय?

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
3

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!
4

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.