Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम भागांत येत्या काही दिवसांत हवामानात बदल होऊ शकतो. बुधवारपासून पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस सुरू होण्याची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 28, 2026 | 07:22 AM
उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

उत्तर प्रदेश, ओडिशात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Follow Us
Follow Us:
  • बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
  • किनारपट्टीच्या भागांत ताशी ११५ ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
  • आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत मुसळधार पावसासह ताशी ११५ ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर-पश्चिम भारतातील हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेशातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम भागांत येत्या काही दिवसांत हवामानात बदल होऊ शकतो. बुधवारपासून पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस सुरू होण्याची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. २९ आणि ३० ऑक्टोबरला अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यानही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. या काळात विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबरपासून हवामानात सुधारणा होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने गंजाम, गजपती, रायगडा, मलकानगिरी, कोरापुट आणि नबरंगपूर या ६ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी ८ मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी २२५ अग्निशमन पथके आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके संवेदनशील जिल्ह्यांत तैनात करण्यात आली आहेत.

चक्रीवादळ तीव्र; दोन दिवस विदर्भात पाऊस

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाले आहे. हवामान विभागानुसार, या चक्रीवादळाचा प्रभाव पूर्व विदर्भातही जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील २ दिवस विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

चक्रीवादळ बुधवारी सकाळपर्यंत आंध्रप्रदेश, यानम किनारपट्टीवर बापटला व विशाखापट्टणमला धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२५ किमी, तर काही ठिकाणी ताशी १४० किमीवर पोहोचू शकतो. वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेल्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचा आढावा घेतला आहे.

FAQ

१. चक्रीवादळाचा धोका कोणत्या राज्यांना आहे?

आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२. वाऱ्यांचा वेग किती असण्याची शक्यता आहे?

किनारपट्टीच्या भागांत ताशी ११५ ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

३. कोणत्या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे?

आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच उत्तर प्रदेशातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Risk of cyclonic storm accompanied by heavy rainfall in uttar pradesh and odisha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • Climate Change
  • cyclone alert
  • Weather Update

संबंधित बातम्या

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट
1

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट

राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी
2

राज्यातील हवामानात होतोय बदल; मराठवाडा, विदर्भ तापतोय तर कोकणात होते अतिवृष्टी

IMD Rain Alert: चक्रीवादळाचे संकट? हवामान विभागाचा या 6 राज्यांना पावसाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या राज्यांना अलर्ट
3

IMD Rain Alert: चक्रीवादळाचे संकट? हवामान विभागाचा या 6 राज्यांना पावसाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या राज्यांना अलर्ट

Berlin : दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, ते 100 अब्ज डॉलर्स कुठे गेले? पियुष गोयल यांचा बर्लिनमध्ये युरोपियन युनियनवर घणाघाती वार
4

Berlin : दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, ते 100 अब्ज डॉलर्स कुठे गेले? पियुष गोयल यांचा बर्लिनमध्ये युरोपियन युनियनवर घणाघाती वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.