Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. दिबांग व्हॅलीमध्ये फ्लॅश फ्लडमुळे लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेल्याने पाच जवान बेपत्ता झाले आहेत, तर लोअर सुबनसिरीमध्ये भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 11:43 AM
अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • दिबांग व्हॅलीमध्ये फ्लॅश फ्लडमुळे ५ जवान बेपत्ता.
  • लोअर सुबनसिरीमध्ये भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू.
  • बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर, ITBP, BRO आणि पोलिसांची संयुक्त शोधमोहीम सुरू.
अरुणाचल प्रदेशात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी आणि नुकसान झाले. दिबांग व्हॅली जिल्ह्यात आलेल्या अचानक पुरात (फ्लॅश फ्लड) लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेले. या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे पाच जवान बेपत्ता झाले आहेत. दुसरीकडे, लोअर सुबनसिरी जिल्ह्यात रस्त्याच्या कटिंगच्या ठिकाणी झालेल्या भीषण भूस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला.

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

लोअर सुबनसिरी जिल्ह्यातील केओजारिंग-व्याचिंग रस्ता कटिंगच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यावेळी अनेक कामगार आणि स्थानिक नागरिक ढिगाऱ्याखाली दबले. या दुर्घटनेत तादू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी आणि बाबुल अली यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बाबुल अली यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे.

लष्करी छावणीत पाणी

दिबांग व्हॅली जिल्ह्यातील पसू पानी लष्करी छावणीत मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक पुरामुळे ५थ्या ग्रेनेडियर्सचे दोन शेल्टर वाहून गेले. पुराच्या वेगवान प्रवाहात एकूण सात जवान वाहून गेले. त्यापैकी दोन जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून, हवालदार उपेंदर, कुंदन, विनोद, आदित्य आणि समुदा है पाच जवान अद्याप बेपत्ता आहेत.

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

शोधमोहीम युद्धपातळीवर

बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी ५व्या ग्रेनेडियर्सच्या पचकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच आयटीबीपीच्या ५८व्या बटालियनचे जवान, सीमा रस्ते संघटनेची (बीआरओ) ६२ आरसीसी, अरुणाचल प्रदेश पोलिस आणि स्थानिक स्वयसेवकाच्या संयुक्त पथकाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Arunachal pradesh heavy rain flash flood 5 soldiers missing landslide 4 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Arunachal pradesh
  • Landslide
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू;  बुकिंगला जोरदार प्रतिसाद
1

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश
2

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप
3

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप

Nepal Avalanche: नेपाळमध्ये पुन्हा निसर्गाचा कोप; तिबेट सीमेजवळील हिमलुंग हिमाल बेस कॅम्पवर भयानक हिमस्खलन; 10 जण बेपत्ता
4

Nepal Avalanche: नेपाळमध्ये पुन्हा निसर्गाचा कोप; तिबेट सीमेजवळील हिमलुंग हिमाल बेस कॅम्पवर भयानक हिमस्खलन; 10 जण बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.