Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा

रायगडावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. रोपवे सेवा सुरू झाल्यापासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या गर्दीचा सकारात्मक परिणाम परिसरातील पर्यटनपूरक व्यवसायांवरही होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2026 | 03:11 PM
Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी आणि पर्यटकांची रायगडाकडे धाव
  • रायगड रोपवे सेवा नियोजित मुदतीच्या तब्बल १३ दिवस आधीच सुरू करण्यात आली
  • अनेक कुंटुबे, मित्रमंडळी आणि तरुणांचे समूह रायगड भेटीला प्राधान्य देत आहेत
महाड: दिवाळीचा उत्साह… शिवरायांच्या राजधानीचे आकर्षण… आणि रायगड रोपवेची पुन्हा सुरू झालेली सेवा; या तिन्ही गोष्टींचा संगम सध्या किल्ले रायगडावर पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी आणि पर्यटकांनी रायगडाकडे धाव घेतली असून, रोपवे परिसरासह गडावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. रोपवे सेवा सुरू झाल्यापासून पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र असून, संपूर्ण रायगड परिसर शिवभक्तांच्या वर्दळीने गजबजून गेला आहे. रोपवे परिसरात पर्यटकांची वाहने मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने परिसरात पर्यटनाचा उत्साह अनुभवायला मिळत आहे.

Raigad News: दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; पेणच्या पाबळ खोऱ्यात उभारले ६० ते ७० फुटांचे बंधारे

विशेष म्हणजे, हंगामपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेली रायगड रोपवे सेवा नियोजित मुदतीच्या तब्बल १३ दिवस आधीच सुरू करण्यात आली. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रायगड दर्शनासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रोपवेमुळे कमी वेळेत गडावर पोहोचणे शक्य होत असल्याने अनेक पर्यटकांसाठी रायगड दर्शनाचा मार्ग सुकर झाला आहे. विशेषतः कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना या सुविधेचा मोठा आधार मिळतो. दिवाळीच्या सुट्टीत ही सुविधा उपलब्ध झाल्याने शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

शिवरायांच्या राजधानी रायगडचे आकर्षण कायम!

रायगड म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचे स्थान! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे दर्शन घेण्यासाठी दिवाळीच्या सुट्टयांमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. शिवसमाधी, जगदीश्वर मंदिर, राजदरबार आणि गडावरील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. अनेक कुंटुबे, मित्रमंडळी आणि तरुणांचे समूह रायगड भेटीला प्राधान्य देत आहेत. ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेताना शिवकालीन इतिहासाची अनुभूती घेण्याचा आनंद पर्यटकांना मिळत असून, गडावर सर्वत्र पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

Jalgaon News: धरणात पाणी, पण शेतात ठणठणाट! रब्बीच्या आवर्तनासाठी सामोडे चौफुलीवर रास्तारोको; शेतकऱ्यांचा संताप उफाळला

व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण

पर्यटकांची वाढती संख्या केवळ रायगड किल्ल्यापुरती मर्यादित नसून त्याचा सकारात्मक परिणाम परिसरातील पर्यटनपूरक व्यवसायांवरही होत आहे. हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते, स्थानिक दुकानदार आणि अन्य व्यावसायिकांना पर्यटकांच्या वर्दळीचा फायदा होत असून व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा हा हंगाम स्थानिक व्यावसायिकांसाठी आर्थिकदृष्ट्‌याही दिलासादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Massive tourist rush at raigad fort during diwali holidays ropeway service boosts visitor numbers hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Exclusive Interview: शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अरविंद सावंत यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!
1

Exclusive Interview: शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अरविंद सावंत यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!

Kolhapur Sindhudurg Fort: कोल्हापुरात दिवाळीनिमित्त साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला; हुबेहूब प्रतिकृती पाहून व्हाल थक्क!
2

Kolhapur Sindhudurg Fort: कोल्हापुरात दिवाळीनिमित्त साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला; हुबेहूब प्रतिकृती पाहून व्हाल थक्क!

Raigad News: दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; पेणच्या पाबळ खोऱ्यात उभारले ६० ते ७० फुटांचे बंधारे
3

Raigad News: दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; पेणच्या पाबळ खोऱ्यात उभारले ६० ते ७० फुटांचे बंधारे

Chandrapur News: पतंग उडवताना सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास २५ हजारांचा दंड; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
4

Chandrapur News: पतंग उडवताना सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास २५ हजारांचा दंड; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.