Flood News: वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने ईशान्य भारतात आणि खास करून आसाम राज्यात कहर केला आहे. आसाम राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
आसाम राज्यातील पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. ब्रम्हपुत्रा आणि अन्य नद्यांच्या पाणीपातळीत थोडीफार घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता अजूनही १८ जिल्ह्यातील चार लाख नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आसाम राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने ब्रम्हपुत्रा आणि अन्य नद्यांचे पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान काल दिवसभरात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
कामरूप जिल्ह्यात एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. गुवाहाटी भागातील रूपनगरमध्ये भूस्खलन झाल्याने एक व्यक्ती बेपत्ता झाला आहे. ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी, कुशियरा नदी धोकादायक पातळीच्या वरुनच वाहत आहे.
आसाम राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने १२९६ गावे प्रभावित झाली आहेत. शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांनी एकच आठवड्यात दुसऱ्यांदा बराक घाटी क्षेत्राचा दौरा केला आहे. ब्रम्हपुत्रा नदीला महापूर आल्याने काजिरंगा राष्ट्रीय अभयारण्याचा काही भाग पाण्याखाली गेला आहे.
देशातील १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षीपेक्षा काही दिवस आधीच मान्सून भारतात दाखल झाला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. तर ईशान्य भारतात पावसाने कहरच केला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिजोराम या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
Monsoon Update: ईशान्य भारतातील ‘या’ राज्यांत पावसाचा कहर; २६ जणांचा मृत्यू तर १५०० पर्यटक…
आज आणि उद्या हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने ईशान्य भारतातील राज्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच अनेक राज्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
काही दिवसांपासून देशासह, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. आतापर्यंत जवळपास १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी रेड अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. देशातील सेव्हन सिस्टर्स म्हणजेच आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम व त्रिपुरा राज्यात मान्सून दाखल झाला आहे.