ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
Weather Update: देशातील १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षीपेक्षा काही दिवस आधीच मान्सून भारतात दाखल झाला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. तर ईशान्य भारतात पावसाने कहरच केला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिजोराम या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
ईशान्य भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दरड कोसळणे आशा घटना घडत आहेत. मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिजोराम या राज्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन राज्यात दोन दिवसांत २० पेक्षा जास्त नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.
अरुणाचल प्रदेशमध्ये महामार्गावर भूस्खलन झाल्याने एक गाडी खोल दरीत कोसळली आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सिक्कीम राज्यात मुसळधार पावसाने १५०० पर्यटक अडकल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra Monsoon: राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट; IMD च्या ‘या’ हाय अलर्टने वाढवली चिंता
आज आणि उद्या हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने ईशान्य भारतातील राज्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच अनेक राज्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
ल्या काही दिवसांपासून देशासह, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. आतापर्यंत जवळपास १७ राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी रेड अलर्ट आणि यलो अलर्ट जारी केला आहे. देशातील सेव्हन सिस्टर्स म्हणजेच आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम व त्रिपुरा राज्यात मान्सून दाखल झाला आहे.
India Weather Update: देशातील ‘या’ राज्यांत मान्सून दाखल; कुठे होणार मुसळधार पाऊस? वाचा…
केरळमध्ये वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातसुद्धा १० ते १५ दिवस आधीच मान्सून आला आहे. आयएमडीने केरळ, पाँडिचेरी, कर्नाटकमध्ये गडगडाटासह पाऊस आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे.