Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित डोवाल यांच्या अडचणींत होणार वाढ? ‘त्या’ प्रकरणी अमेरिकेतील कोर्टाने दिल्लीतील कोर्टाकडे मागितली मदत

भारत-अमेरिका संबंध आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने या घडामोडीला महत्त्व आहे. न्यूयॉर्क येथील अमेरिकी जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश कॅथरीन पोल्क फैला यांनी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी हा आदेश दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 20, 2026 | 07:13 AM
डोभाल यांना यूएस कोर्टाची नोटीस

डोभाल यांना यूएस कोर्टाची नोटीस

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या संदर्भात अमेरिकेतील न्यायालयात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे.
  • ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल यांनाही कायदेशीर समन्स बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
  • खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नू याने दाखल केलेल्या दिवाणी खटल्यात हा घटनाक्रम घडला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल आणि ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल यांना कायदेशीर समन्स बजावण्यासाठी अमेरिकेतील न्यायालयाने दिल्लीतील तीन जिल्हा न्यायालयांची मदत घेण्याचे आदेश दिले आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नू याने दाखल केलेल्या खटल्यात हा नवा घटनाक्रम घडला आहे.

भारत-अमेरिका संबंध आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने या घडामोडीला महत्त्व आहे. न्यूयॉर्क येथील अमेरिकी जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश कॅथरीन पोल्क फैला यांनी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी हा आदेश दिला. न्यायालयाच्या लिपिकाला न्यायालयीन कागदपत्रे आंतरराष्ट्रीय टपाल किंवा कुरिअरद्वारे दिल्लीतील पटियाला हाऊस, द्वारका आणि तीस हजारी या तीन जिल्हा न्यायालयांकडे पाठवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

दरम्यान, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या आणि प्रतिबंधित ‘सिख्स फॉर जस्टिस’ (एसएफजे) या संघटनेचा संस्थापक गुरपतवंतसिंग पन्नू याने हा खटला दाखल केला आहे. २०२३ मध्ये अमेरिकेच्या भूमीवर आपली हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचा त्याचा आरोप आहे.

या प्रकरणात त्याने भारत सरकार, अजित डोभाल, ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल, माजी ‘रॉ’ अधिकारी विक्रम यादव आणि भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांना प्रतिवादी केले आहे. या कथित कटप्रकरणी त्याने अमेरिकी न्यायालयात दिवाणी खटला दाखल करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र, हे आरोप असून ते न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

FAQ

1. अजित डोवाल यांना अमेरिकेतील न्यायालयाने नोटीस का बजावली आहे?

गुरपतवंतसिंग पन्नू याने दाखल केलेल्या दिवाणी खटल्यात अजित डोवाल यांना कायदेशीर समन्स बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

2. या प्रकरणात अजित डोवाल यांच्यासोबत आणखी कोणाचे नाव आहे?

‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल यांनाही समन्स बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

3. अमेरिकेतील कोणत्या न्यायालयाने हा आदेश दिला?

न्यूयॉर्कमधील अमेरिकेच्या दक्षिण जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

Web Title: Assist in serving summons to ajit doval and former raw chief us court seeks help from delhi courts nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:13 AM

Topics:  

  • Ajit Doval
  • national news

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana: लाभ बंद झाल्याने बजेट कोलमडले; ९१ लाख अपात्र महिलांच्या प्रश्नावर सरकार काय निर्णय घेणार?
1

Ladki Bahin Yojana: लाभ बंद झाल्याने बजेट कोलमडले; ९१ लाख अपात्र महिलांच्या प्रश्नावर सरकार काय निर्णय घेणार?

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार
2

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त; सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात
4

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त; सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.