Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त; सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांपैकी ८०% लोकांची इच्छा अशी की, सरकारने साठेबाजी करणाऱ्यांवर आणि कृत्रिमरित्या किमती वाढवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 18, 2026 | 08:48 AM
महागाईचा फटका; ६० टक्के गृहिणींचे बजेट कोलमडले

महागाईचा फटका; ६० टक्के गृहिणींचे बजेट कोलमडले

Follow Us
Follow Us:
  • देशातील वाढत्या महागाईचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या घरगुती बजेटवर होत आहे.
  • दूध, डाळी, खाद्यतेल, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
  • महागाईमुळे गृहिणींना घरखर्चाचे नियोजन करताना अडचणी येत आहेत.

नवी दिल्ली : देशातील महागाईचा परिणाम आता सर्वसामान्य लोकांच्या स्वयंपाकघरातील आणि घरगुती खर्चावर थेट दिसून येत आहे. दूध, डाळी, तेल, भाजीपाला आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. लोकांना अनावश्यक खर्चात कपात करण्यास आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कमी करण्यास परिस्थिती भाग पाडत आहे.

देशातील ६१ टक्के कुटुंबांचा, म्हणजेच जवळपास १० पैकी सहा कुटुंबांचा, गेल्या १२ महिन्यांत जीवनावश्यक घरगुती वस्तूंवरील मासिक खर्च २० टक्क्यांहून अधिक वाढला आहे, असे लोकल सर्कल्सने केलेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणात असे दिसून आले आहे. हे सर्वेक्षण देशभरातील ३२६ जिल्ह्यांमधील १.३४ लाखांहून अधिक ग्राहकांत करण्यात आले. महागाईचा सर्वाधिक परिणाम खाद्यपदार्थांवर झाला आहे. अमूल आणि मदर डेअरीने १२ नोव्हेंबर २०२६ पासून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली. चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी दरवाढ आहे.

कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी दुधाच्या दरात प्रति लिटर ८ रुपयांनी वाढ केली आहे. पनीर आणि तूपही महागले. अमूलने तुपाच्या दरात प्रति किलो ५० रुपयांनी आणि बटरच्या दरात प्रति किलो १५ रुपयांनी वाढ केली आहे. वाढत्या किमतींमुळे कुटुंबे त्यांच्या खर्चाच्या पद्धती बदलत आहेत. सर्वेक्षण केलेल्यांपैकी ७४% लोकांनी अनावश्यक खर्चात कपात केल्याचे सांगितले.

वस्तू खरेदीतही करण्यात आली कपात

५०% लोकांनी सांगितले, ते पूर्वीपेक्षा मोजक्या वस्तूंची खरेदी करतात आहे. याचा अर्थ असा की, महागाई लोकांना त्यांच्या गरजांमध्ये बदल करण्यास भाग पाडत आहे. सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांपैकी ८०% लोकांची इच्छा अशी की, सरकारने साठेबाजी करणाऱ्यांवर आणि कृत्रिमरित्या किमती वाढवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांसमोर खर्च आणि बचत यांचा ताळमेळ साधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

किमतींमधील सर्वात मोठी वाढ

सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के ग्राहकांना तूप, लोणी आणि खाद्यतेलाच्या किमतींमध्ये सर्वांत मोठी वाढ जाणवली. दरम्यान, ७३% प्रतिसादकांनी ताज्या भाज्यांच्या किमती वाढल्याचे, तर ७१% प्रतिसादकांनी तांदूळ, गहू आणि इतर धान्यांच्या किमती वाढल्याचे सांगितले. घाऊक बाजारातही महागाईचा दबाव दिसून आला. बँक ऑफ बडोदाचा अत्यावश्यक वस्तू निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ११.१% ने वाढला.

FAQ

1. देशातील किती टक्के कुटुंबांचे बजेट महागाईमुळे कोलमडले आहे?

लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार, देशातील ६१ टक्के कुटुंबांचा जीवनावश्यक घरगुती वस्तूंवरील खर्च २० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

2. महागाईचा सर्वाधिक परिणाम कोणत्या वस्तूंवर झाला आहे?

दूध, डाळी, खाद्यतेल, भाजीपाला आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर महागाईचा परिणाम झाला आहे.

3. लोकल सर्कल्सचे सर्वेक्षण किती जिल्ह्यांत करण्यात आले?

देशभरातील ३२६ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

Web Title: People in country are troubled by rising inflation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • Inflation Increases
  • national news

संबंधित बातम्या

Indradev Maharaj Sexual Assault Case: २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; महामंडलेश्वर इंद्रदेव महाराजांवर गंभीर आरोप
1

Indradev Maharaj Sexual Assault Case: २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण; महामंडलेश्वर इंद्रदेव महाराजांवर गंभीर आरोप

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख
2

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: रोहित पवार करणार त्या मफलरवाल्याचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.