
Attempts to bomb Varanasi or Ayodhya Delhi Red Fort bomb blast case
Red Fort Bomb Blast: नवी दिल्ली: लाल किल्ला परिसरामध्ये भीषण स्फोट झाला. सोमवारी झालेल्या या स्फोटामध्ये 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 24 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर होत असून यावर गृहमंत्री अमित शाह हे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या कट रचण्यामध्ये काही डॉक्टरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली. याबाबत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर डॉ. शाहीनने कबुली देखील दिली. फक्त हेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून या स्फोटाची योजना आखली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींना देशातील विविध भागातून अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली जात असून यामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. चालत्या गाडीमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटासाठी प्लॅनिंग करण्यात आले होते. मात्र सुरुवातीपासून केवळ दिल्ली हे टार्गेट नव्हते. तर दिल्ली लाल किल्ला हे त्यांचे टार्गेट नसून त्यांचा प्लॅन यापेक्षाही कितीतरी पट खतरनाक असल्याचे आरोपींच्या चौकशीतून समोर आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बॉम्बस्फोटाची तयारी करणाऱ्या दहशतवाद्यांना जास्तीत जास्त लोकांना नुकसान पोहोचवायचे होते आणि त्यांची टार्गेट जास्त गर्दीची ठिकाणे होते. यासाठी दिल्लीमध्ये नाही तर जास्त गर्दी असलेल्या अयोध्या आणि वाराणसी ही ठिकाणे टार्गेटवर होती. दिल्लीतील स्फोट घाईत झाल्याचे देखील सांगण्यात आले. स्फोटात वापरलेले साहित्य बांगलादेश आणि नेपाळच्या मार्गे भारतात आणले गेले. मोठा कट दहशतवाद्यांकडून आखण्यात आला होता. दहशतवादी उमर हाच गाडी चालवत होता. त्याचा टोल नाक्यावरचा व्हिडिओ व्हायरल झाला.
आतापर्यंतच्या चौकशी आणि तपासातून असे दिसून येते की, स्फोटकांमध्ये कोणताही टायमर नव्हता. हा स्फोट घाईघाईत झाला. दहशतवाद्यांनी चाैकशीत सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या ठिकाणी उडवायचा होता. सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे की, उर्वरित 300 किलो अमोनियम नायट्रेट त्यांना जप्त करायचा आहे. याकरिता दहशतवाद्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. दहशतवाद्यांनी हे लपून ठेवले आहे.
दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
भारतातील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) ची महिला कमांडर डॉ. शाहीन शाहिद हिने तपास यंत्रणांसमोर कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून स्फोटके साठवत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे ध्येय भारतात मोठे दहशतवादी हल्ले करणे असे होते. चौकशीदरम्यान डॉ. शाहीनने अनेक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की ती तिचे सहकारी मुझम्मिल आणि आदिल यांच्यासोबत अमोनियम नायट्रेटसारखे स्फोटके साठवत होती. ही संपूर्ण कारवाई जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केली जात होती.