
गुरूग्राम: एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात बंगळुरू पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अतुलची पत्नी आणि आरोपी निकिता सिंघानिया यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. निकिता हरियाणातील गुरुग्राममध्ये लपून बसली होती. निकिताची आई निशा सिंघानिया आणि निशाच्या भाऊ अनुरागलाही अटक करण्यात आली आहे.
निशा आणि निकीताचा भाऊ अनुराग प्रयागराजमध्ये लपून बसले होते. याची माहिती मिळताच बेंगळुरू पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले. मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबरला बेंगळुरू पोलिसांनी निकिताला गुरुग्राममधून अटक केली. त्याच दिवशी निकिताची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग यांनाही प्रयागराज, यूपी येथून अटक करण्यात आली.
यानंतर तिघांनाही प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. निकिताचा मामा सुशील सिंघानिया सध्या फरार आहे. त्यांचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. जौनपूरसह अनेक भागात सुशीलचा शोध सुरू आहे.
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा रजत दलालवर संतापला! म्हणाला – एवढाच शक्तिशाली आहेस
अतुल सुभाष यांनी 9 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने तासाभराहून अधिक काळ व्हिडिओ बनवला. “माझ्या मृत्यूला पाच लोक जबाबदार आहेत. माझी पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा, भावजय अनुराग, काका-सासरे सुशील आणि न्यायाधीश रीता कौशिक. या लोकांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले. गेल्या काही वर्षांपासून माझ्यावर सातत्याने अत्याचार होत आहेत. आता मृत्यू हा माझा शेवटचा पर्याय आहे. अतुलने 24 पानी सुसाईड नोटही टाकली आहे.
सुसाईड नोटमध्ये, “मी 80 हजार रुपये कमावणारी व्यक्ती आहे. माझी पत्नी स्वतः माझ्यापासून दूर गेली. ती माझ्या मुलालाही घेऊन गेली. माझ्यावर 9 खोटे गुन्हे दाखल केले. ज्यांच्या सुनावणीसाठी मला बंगलोरहून जौनपूरला वारंवार जावे लागायचे. मी निर्दोष असल्याचा पुरावाही सादर केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मी मुलासाठी प्रतिमहिना 40 हजार रुपयेही पाठवले. मात्र तरीही माझ्याकडून दरमहा 80 हजार रुपये मागितले जात आहेत. हा माझा स्वतःचा पगार आहे. पण माझी पत्नीदेखील चांगली कमावते. न्यायालयही माझे ऐकत नाही,” असा आरोप अतुल सुभाष यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला होता.
Vivah Muhurat 2025 List: 2025 मध्ये कोणते आहेत शुभमुहूर्त, नव्या वर्षातील लग्नाच्या
तसेच, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रिता कौशिक फक्त माझ्या पत्नीचेच ऐकतात. माझ्या पत्नीने माझ्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली असता, मी पैसे देण्यास नकार दिला. ते चुकीचे असल्याचे सांगितले. माझी पत्नी कुठे खोटे बोलली याचा पुरावाही मी न्यायाधीशांसमोर दिला. तरीही न्यायाधीश रीता कौशिक म्हणाल्या- तुमच्याकडे 3 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमची पत्नी पैसे मागत आहे. मी याला विरोध केला असता न्यायाधीश म्हणाले की, मी तिला 5 लाख रुपये दिले तर खटला निकाली काढता येईल. पण मी कायद्याचे पालन करतो. मी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. पण त्यानंतरही पत्नी, सासरे आणि न्यायाधीश यांच्याकडून पैशांसाठी माझा वारंवार मानसिक छळ करण्यात आला.”
या घटनेनंतर अतुल सुभाषच्या वडिलांचा एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये ते त्यांच्या अग्नीपरीक्षेचे वर्णन करताना दिसत होते. अतुल सुभाषचे वडील पवन मोदी म्हणाले, ‘मार्च महिन्यानंतर अतुल आले तेव्हा त्यांनी सांगितले की, वडील न्यायाधीश आणि वकील आहेत, हे लोक भारताचे कायदे पाळत नाहीत.’ असही अतुलच्या वडिलांनी म्हटलं आहे.