
मंत्री लोढा यांना अस्लम शेख यांची धमकी
मंत्री लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार
मुंबई भाजप अध्यक्ष साटम यांनी व्यक्त केला संताप
Death Threat To Mangal Prabhat Lodha: राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सातत्याने मुंबईच्या सुरक्षेबाबत भाष्य करत असतात. तसेच ते सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान याच कारणावरून मुंबईमधील कॉँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना संपवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मालाड मालवणी चे आमदार अस्लम शेख यांनी मला व माझ्या कुटुंबाला दिलेल्या धमकी विरुद्ध कारवाई करण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्त श्री देवेन भारती जी यांना पत्राद्वारे केली. pic.twitter.com/oLJrkhaQdA — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 21, 2025
काय म्हणाले मंत्री लोढा?
मालाड मालवणी चे आमदार अस्लम शेख यांनी मला व माझ्या कुटुंबाला दिलेल्या धमकी विरुद्ध कारवाई करण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्त श्री देवेन भारती जी यांना पत्राद्वारे केली. आमदार अस्लम शेख सारख्या विघटनवादी शक्तींनी कितीही धमक्या दिल्या तरी देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर कसलीही तमा न बाळगता रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात कठोर कारवाईचा पाठपुरावा करत राहणार आहे.
अमित साटम यांनी व्यक्त केला संताप
मालाड – मालवणीचे आमदार हे सातत्याने रोहिंगे आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला प्राधान्य देऊन त्यांनी मालवणी पॅटर्न राबवला आहे. चौक सभा घेऊन त्यांनी दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. उलट त्यांचा मालवणी पॅटर्न आम्ही मुळापासून उपटून टाकणार आहोत,असा संताप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. मंत्री लोढा यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करावी.
मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी
कीकडे मालाड आणि मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी आणि रोहींगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच दक्षिण मुंबईतही घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी उघड केले आहे. यासंदर्भात घुसखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
गिरगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंगे फेरीवाले राजरोसपणे व्यवसाय करत असून त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी पोलीस आयुक्त भारती यांना दिली आहे आणि यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे. गेले अनेक महिने सातत्याने मंगलप्रभात लोढा या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत आणि पाठपुरावा करत आहेत.