Ayodhya Deepotsav 2025 Sarayu River 23 lakh Guinness World Record diya Uttar Pradesh News
Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या: ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या अयोध्यानगरीमध्ये आज (दि.19) भव्य असा दीपोत्सव सोहळा होणार आहे. दिवाळीचा सण हा प्रभू श्री रामांच्या लंकावरील विजयाचा विजयोत्सव मानला जातो. या निमित्ताने प्रभू रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये नेत्रदीपक असा दिव्यांचा झगमगाट केला जातो. शरयू नदीच्या तीरावर लाखो दिवे लाऊन दिवाळी साजरी केली जाते. तसेच लेझर आणि लाईट शो देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या साक्षीने अयोध्येतील या दीपोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
भक्ती, प्रकाश आणि संस्कृतीचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या अयोध्या दीपोत्सव 2025 या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशातून लाखो लोक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. सकाळपासून या सोहळ्याला सुरुवात झाली असून भाविकांसह साधू-संत देखील या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आले आहेत. शरयू नदीच्या तीरावर मातीच्या दिव्यांच्या मोठ्या रांगा लावण्यात आल्या आहेत. अतिशय शिस्तबंद पद्धतीने लावण्यात आलेली ही दिव्याची आरास लक्षवेधी ठरत आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशातील कलाकारांनी माँ कालीचे बोनालू नृत्य सादर केले, हा उत्सव तेलंगणा प्रदेशात महाकालीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. आज अयोध्येत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला जाणार आहे.
अयोध्या नगरीमध्ये दीपोत्सव 2025मध्ये लाखो दिव्यांची आरास करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आज अयोध्येतील राम की पैडी येथे २६ लाखांहून अधिक दिवे (मातीचे दिवे) लावण्यात येणार आहे. त्यामुळे अयोध्येचे आसमंत पूर्णपणे उजळून निघणार आहे. हे दीपप्रज्वलन संध्याकाळी ५:५० ते ६:१५ या वेळेत होणार आहे. त्यापूर्वी अयोध्येच्या रस्त्यावर मोठ्या उत्साहात मिरवणूका निघाल्या आहेत. यामध्ये भव्य आरास असलेले देखावे देखील दिसून आले आहेत. वाळीच्या एक दिवस आधी काढण्यात आलेल्या या चित्ररथांमुळे अयोध्येचे दृश्य पूर्णपणे बदलले. दीपोत्सवानिमित्त अयोध्या शहरात सुंदर चित्ररथ सजवण्यात आले होते. रथावर भगवान श्री राम यांच्या बालपणीच्या प्रसंगाचे सादरीकरण देखील दाखवण्यात आले ज्यामध्ये लहान मुलांना राम आणि सिया म्हणून सजवण्यात आले होते. उत्तर प्रदेश सरकारचे पर्यटन मंत्री जयवीर सिंह यांनी रविवारी भगवान श्री राम यांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत जय श्री रामचा ध्वज फडकावून रामायण काळातील चित्ररथ दाखवण्यात आले.
जय राम रमा रमनं समनं। भव ताप भयाकुल पाहि जनम॥
अवधेस सुरेस रमेस बिभो। सरनागत मागत पाहि प्रभो॥ प्रभु श्री राम के स्वागत हेतु अयोध्या धाम तैयार… आइए, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम के आदर्शों, लोक-कल्याण एवं सर्वसमावेशी भावना को आत्मसात करते हुए ‘दीपोत्सव-2025’ के साक्षी… pic.twitter.com/6JC6iy6VUq — Government of UP (@UPGovt) October 19, 2025
राम की पैडी येथे रात्री ८:३० वाजता भव्य लेसर, प्रकाश आणि ध्वनी आणि ड्रोन शो आयोजित केला जाणार आहे. शेकडो ड्रोनने अनोखा ड्रोन शो देखील आयोजित करण्यात आला आहे. या दीपोत्सव सोहळ्याचे यंदाचे नववे वर्षे असून यामुळे उत्तर प्रदेशमधील दिवाळी कौतुकाचा विषय बनली आहे. दीपोत्सवामुळे अयोध्या शहर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघेल आणि शरयू नदीच्या काठावरून निघणाऱ्या भक्तीगीतांमुळे वातावरण चैतन्यमयी होऊन जाणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अयोध्येत होणारा या वर्षीचा दीपोत्सव अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. हा कार्यक्रम आणखी भव्य करण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरू आहे. यावर्षी दीपोत्सव २०२५ दरम्यान दोन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले जातील.पहिला विक्रम २६ लाख ११ हजार १०१ दिवे प्रज्वलित करून केला जाईल. दुसरा विक्रम शरयू आरती दरम्यान २१०० दिवे दान करून केला जाईल. स्वयंसहाय्यता गटातील महिला, संस्कृत शाळांमधील विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक शरयू आरतीमध्ये सहभागी होतील.