नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर देखील संपूर्ण देशभरात दहशतवादाविरोधात मोठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर खोऱ्यात तर भारतीय लष्कराने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्यानंतर देशातील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. मात्र गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अलर्टने पुन्हा एकदा देशावर हल्ल्याचा इशारा दिला आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात.
देशात दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी याबाबतचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे डेसातील सर्व विमानतळे, महत्वाच्या संस्था आणि ठिकाणे इथे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे. BCAS ने याबाबतचा इशारा जारी केला आहे. या अलर्टनुसार देशातील विवीध भागात दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आहे. BCAS ने सर्व एअरपोर्ट्ससह महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
BCAS नुसार, असामाजिक घटनांमुळे देशाला धोका निर्माण होऊ शकतो. देशाच्या कोणत्याही भागात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात यावी. कडक सुरक्षा व्यवस्था राखणे गरजेचे असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे सहकार्य आवश्यक असणार आहे. कोणीतही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास नागरिकांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधावा. जेणेकरून सुरक्षा यंत्रणा त्यावर कारवाई करू शकतील.
अखनूरमध्ये लष्कराने घातले दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखनूर भागात भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. काल रात्रीपासून ही जोरदार चकमक सुरु आहे. भारतीय सेना, एसओजी, जम्मू काश्मीर पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन राबवले जात आहे. चकमकीत आतापर्यंत एका दहशत्वाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.
Jammu-Kashmir: पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच! अखनूरमध्ये लष्कराने घातले दहशतवाद्यांना कंठस्नान
अखनूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. संपूर्ण परिसराला लष्कराने वेढा घातला आहे. कारवाई करत असताना दहशत्वाद्यानीगोळीबार केल्याने लष्कराने त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर ही चकमक अजूनही सुरूच आहे. अजूनही हे सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्यामुळे या परिसरात अजून काही दहशतवादी लपले असल्याची शंका लष्कराला आहे. अनंतनागमध्ये भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रास्त्र साठ्यासह अटक केली होती. यामुळे पुलवामा येथे होणाऱ्या हल्ल्याचा कट लष्कराने उधळून लावला होता.