जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश (फोटो- ani)
१. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर खोऱ्यात दहशतवादाविरुद्ध कारवाई तीव्र
२. पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान
३. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा
कुलगाम/Terrorist Killed: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दशतवादाविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. काही दिवस आधीच ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान काल रात्री देखील भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. कुलगाममध्ये लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखनूर भागात भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. काल रात्रीपासून ही जोरदार चकमक सुरु आहे. भारतीय सेना, एसओजी, जम्मू काश्मीर पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन राबवले जात आहे. चकमकीत आतापर्यंत एका दहशत्वाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.
अखनूर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. संपूर्ण परिसराला लष्कराने वेढा घातला आहे. कारवाई करत असताना दहशत्वाद्यानीगोळीबार केल्याने लष्कराने त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर ही चकमक अजूनही सुरूच आहे. अजूनही हे सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्यामुळे या परिसरात अजून काही दहशतवादी लपले असल्याची शंका लष्कराला आहे.
अनंतनागमध्ये भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रास्त्र साठ्यासह अटक केली होती. यामुळे पुलवामा येथे होणाऱ्या हल्ल्याचा कट लष्कराने उधळून लावला होता. तसेच दक्षिण काश्मीरच्या अखल जिल्ह्यात काही दहशतवादी लपले असल्याची बातमी समोर आली आहे. माहिती प्राप्त होताच भारतीय लष्कराने या परिसरात घेराबंदी केली आहे. मोठ्या वेगाने सर्च ऑपरेशन सुरु आहे.
जम्मू-काश्मीरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत शूर जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार मारण्यात आलेले तीन दहशतवादी हे लष्कर ए तोयबाचे असल्याचे समजते आहे.
Jammu-Kashmir: ऑपरेशन सिंदूरनंतर देखील पाकिस्तान सुधरेना! लष्कराने घातले तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
दक्षिण काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या तीन दहशतवाद्यांनी मोठे नुकसान करण्याचे ठरवले होते. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देखील पाकिस्तान सुधारला नसल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी भारतात पाठवण्याचे सत्र अजूनही थांबलेले दिसत नाहीये. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क झाले आहे.