लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपकडून आज राजधानी दिल्लीमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यालयात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी संकल्प पत्र जरी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी या आधीसुद्धा सांगितले होते, देशामध्ये फक्त चार जाती आहेत. तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. त्यामुळे या चार जाती लक्षात घेऊन भाजपने या चार जातीच्या उन्नतीसाठी अनेक योजनांचा यामध्ये समावेश केला आहे.
तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी यांना सक्षम करणार
२०२७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचे आहे, हा संकल्प लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प पत्रात अनेक उपाययोजना मांडल्या आहेत. या जाहीरनाम्यात त्यांनी संपूर्ण रोजमाप सादर केला आहे. भाजपच्या जाहीरनाम्याचे अनावरण करताना नरेंद्र मोदी म्हणाले, हा योगायोग फार मोठा आहे. आज आंबेडकर जयंती सुद्धा आहे. संपूर्ण देश भाजपच्या संकल्प पत्राची वाट पाहत होत. त्याचे एक मोठं कारण म्हणजे गेल्या १० वर्षात भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेल्या प्रत्येक गोष्टीला अंमलात आणले आहे. हे संकल्प पत्र भारतातील सर्व चारही बाजूना सक्षम करण्यासाठी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
#WATCH | BJP ‘Sankalp Patra’/manifesto release: Prime Minister Narendra Modi says, “This is a very holy day. Several states in the country are celebrating the ‘nav varsh’…Today, on the 6th day of Navaratri we pray to Maa Katyayani. She holds the lotus in both her hands. This… pic.twitter.com/g8qXvVjUSQ
— ANI (@ANI) April 14, 2024
पुढील ५ वर्षे मोफत रेशन
नरेंद्र मोदी म्हणाले, आमचे लक्ष जीवनाची प्रतिष्ठा जीवनाची गुणवत्ता आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून नोकऱ्यांवर भर देणं आहे. सरकार मार्फत मिळणारे मोफत रेशन ही योजना पुढील पाच वर्षे चालू राहील, अशी नरेंद्र मोदी यांनी सरकारला दिली आहे. गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल याची आम्ही खात्री देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आम्ही संकल्प केला आहे की ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक वृद्धाला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय असो उच्च मध्यमवर्गीय असो, त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली जाणार आहे.