
आला रे... PM Kisan Yojana चा 24 वा हफ्ता आला! ( सौजन्य - सोशल मीडिया )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी, सकाळी अंदाजे १०:३० वाजता गुजरातच्या बनासकांठा येथील एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी-इन विट्रो फर्टिलायझेशन प्रयोगशाळा आणि भारत बोवाइन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटरच्या पशु फार्मला भेट दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सकाळी सुमारे ११:३० वाजता बनासकांठा येथे १४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले, उद्घाटन केले आणि ते राष्ट्राला समर्पित केले. यानंतर त्यांनी एक बटण दाबून पीएम-किसान योजनेअंतर्गत १९,००० कोटी रुपयांच्या २४ व्या हप्त्याचे वितरण केले.
म्हणजे पीएम किसान योजनेचा 24 वा हफ्ता प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सकाळी 11.30 वाजता जमा झाला आहे. या हफ्त्याद्वारे देशभरातील 9.34 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18690 कोटींहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचं अकाऊंट चेक केलं नसेल तर लगेच चेक करा.
जर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी असाल आणि तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर तुम्ही काही सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून घरबसल्या पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची स्थिती तपासू शकता.
पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता तुमच्या खात्यात आला आहे की नाही, याची स्थिती तुम्ही घरबसल्या सहजपणे तपासू शकता.
सर्वप्रथम, पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्या.
होमपेजवरील ‘शेतकरी कॉर्नर’ वर जा आणि Know Your Status वर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा प्रविष्ट करा.
यानंतर, मागितलेली माहिती आणि ओटीपी वापरून तुमच्या ओळखीची पुष्टी करा.
आता तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती सहजपणे तपासू शकता. पेमेंट जारी झाले आहे की प्रलंबित आहे, याबद्दलची माहिती तुम्हाला मिळू शकते.
एसएमएस, मोबाईल बँकिंग ॲप, पासबुक अपडेट किंवा बँक शाखेद्वारे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही याची खात्री करा. पोर्टलवर फक्त Payment Released असे दिसण्याचा अर्थ पैसे जमा झाले आहेत असा होत नाही.
जर तुमच्या पेमेंटची स्थिती दिसत नसेल किंवा हप्ता अडकला असेल, तर सर्वप्रथम तुमचे e-KYC आणि जमिनीशी संबंधित माहिती तपासा. शेतकरी मदतीसाठी १५५२६१ किंवा ०११-२४३००६०६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याव्यतिरिक्त, ते पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध असलेल्या किसान ई-मित्र चॅटबॉटवरूनही माहिती मिळवू शकतात.
Ans: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता नुकताच देशातील पात्र शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आला आहे.
Ans: 24 व्या हप्त्यामध्ये देशातील एकूण ९.३४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २,००० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
Ans: शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'Beneficiary Status' पर्यायावर क्लिक करून आपले आधार किंवा बँक खाते क्रमांक टाकून हप्त्याचे स्टेटस तपासू शकतात.