Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS Nagpur News: मोदी-शाहांची ताकद कमी होणार; राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघ मुख्यालयातून मोठे संकेत

आरएसएस हा भारतीय जनता पक्षाचा वैचारिक मार्गदर्शक आहे. अध्यक्षांच्या निवडीत आरएसएसची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु उघडपणे हस्तक्षेप करत नाही. त्याऐवजी, ते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाशी सल्लामसलत करते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 14, 2025 | 07:44 PM
RSS Nagpur News: मोदी-शाहांची ताकद कमी होणार; राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघ मुख्यालयातून मोठे संकेत
Follow Us
Close
Follow Us:

BJP National President: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षांकडून नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचाली सुरू आहेत. आतापर्यंच अध्यक्षपदासाठी अनेकांच्या नावे समोर आली आहेत. पण अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे भाजप संघटनेत उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ मध्येच संपला आहे. पण त्यानंतरही त्यांना काही महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पाच देशांच्या दौऱ्यावर अससल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला विलंब होत असल्याची चर्चा होती. पण आता तेदेखील दौऱ्यावरून परत्यामुळए आता लवकरच नवीन भाजप अध्यक्षांना मान्यता मिळू शकते असे मानले जाते.

यानिमित्ताने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या निवडीत किती सक्रिय असेल? संघाची विचारधारा आणि भाजप यांचा जुना संबंध आहे. त्यामुळे संघाचा अप्रत्यक्ष प्रभाव किंवा सल्ला हा अध्यक्षपदाच्या निवडीत महत्त्वाचा असतो. भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत निर्णयप्रक्रिया ही पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीभूत झाली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय मोदी-शहा जोडीचाच निर्णायक ठरत असतो, हे अनेक वेळा दिसून आलं आहे. या सगळ्यात नागपूरमधून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Mumbai Plane Accident Breaking: मुंबई एअरपोर्टवर मोठा अपघात! मालवाहू ट्रकची विमानाला धडक अन्…

नागपूरहून काय संदेश आला?

एका मीडिया रिपोर्टनुसार, भाजपच्या पुढील अध्यक्षांच्या नावांच्या चर्चेदरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कडून नागपूरहून एक स्पष्ट संदेश आला आहे की भाजपचा पुढील अध्यक्ष केवळ रणनीतीकार नसावा, तर वैचारिकदृष्ट्या मजबूत आणि संघटनेशी खोलवर जोडलेला असावा. आरएसएसला भाजपचा पुढचा अध्यक्ष तरुण आणि तळागाळातील असावा असे वाटते. तो थेट शाखा, प्रचारक आणि बूथ लेव्हल कार्यकर्त्यांशी जोडलेला असावा. त्याच्याकडे वैचारिक स्पष्टता असावी. समान नागरी संहिता (यूसीसी), लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद यासारख्या मुद्द्यांवर त्याचे स्पष्ट विचार असले पाहिजेत.

आरएसएसला खटकतात भाजपच्या या गोष्टी

याशिवाय आरएसएसने काही गोष्टींची चिंताही व्यक्त केली आहे. जिंकण्याच्या इच्छेपोटी, भाजप अशा अनेक लोकांना पक्षात घेत आहे, ज्यांना सातत्याने विरोध होत आहे. तसेच इतरबाहेरील पक्षातून आलेले नेते आणि तंत्रज्ञांचा वाढता प्रभावही आरएसएसला आवडत नसल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या मूळ विचारसरणीला वैचारिकदृष्ट्या बळकटी देईल, असा व्यक्ती पक्षाचा नवा अध्यक्ष असावा, अशी आरएसएसची इच्छा आहे.

आरएसएस आणि भाजपमधील संबंध परस्पर संमती आणि संतुलनावर आधारित आहेत. मोदींची लोकप्रियता आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीमुळे गेल्या दशकात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. परंतु २०२४ च्या निवडणूक निकालांनी हे दाखवून दिले आहे की आता विजयासाठी फक्त मोदींची प्रतिमा पुरेशी राहिलेली नाही. त्यासाठी पक्षाला वैचारिक दृढता आणि संघटनात्मक ताकदीवर लक्ष केंद्रित करावे लागेल, असेही आरएसएसची इच्छा आहे.

IND Vs ENG : आर्चरमुळे भारत अडचणीत; पंत मागोमाग सुंदरचा अप्रतिम झेल टिपत दाखवला बाहेरचा रस्ता

२०२४ नंतर भाजपच्या अनेक राज्य घटकांमध्ये असंतोष वाढला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. नवीन अध्यक्षांनी हे मतभेद दूर करावेत आणि पक्षातील एकजूट ठेवावी अशी आरएसएसची इच्छा आहे. तसेच, त्यांनी संस्कृत शिक्षण आणि आयुर्वेदासारख्या सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्द्यांना प्रोत्साहन द्यावे, असा विचार आरएसएसकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आरएसएसची भूमिका काय आहे?

आरएसएस हा भारतीय जनता पक्षाचा वैचारिक मार्गदर्शक आहे. अध्यक्षांच्या निवडीत आरएसएसची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु उघडपणे हस्तक्षेप करत नाही. त्याऐवजी, ते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाशी सल्लामसलत करते. नवीन अध्यक्षांनी संघटनेला स्वायत्तता द्यावी आणि कार्यकर्त्यांचा आवाज ऐकावा, असे आरएसएसला वाटते.

मोदी आणि शहा हे अजूनही भाजपचे सर्वात मोठे चेहरे आहेत. परंतु आरएसएसचा असा विश्वास आहे की पक्षाला आता दुसऱ्या फळीचे नेतृत्व तयार करावे लागेल, विशेषतः सप्टेंबर २०२५ मध्ये मोदी ७५ वर्षांचे होणार असल्याने. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अलीकडेच म्हटले आहे की ७५ वर्षांच्या वयानंतर सार्वजनिक जीवनात नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. देशात याबद्दल अनेकांची नावे समोर आली होती. यातसंभाव्य उमेदवारांमध्ये नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह ,चौहान आणि निर्मला सीतारमण यांची नावे चर्चेत आहेत. इतकेच नव्हे तर, निर्मला सीतारमण, डी. पुरंदेश्वरी किंवा वनती श्रीनिवासन सारख्या पहिल्यांदाच एखाद्या महिलेला अध्यक्षपदासाठी बनवण्यास पाठिंबा देऊ शकते, असेही संकेत मिळत आहेत.

 

Web Title: Big hint from rashtriya swayamsevak sangh headquarters for the post of national president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • BJP
  • BJP National President
  • RSS

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.