Bihar Election 2025:
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून बिहारमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. या सगळ्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले भोजपुरी गायक आणि सुपरस्टार पवन सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं आहे. निवडणूक लढवण्याचा आपला कोणताही हेतू नाही, आपल्याला फक्त पक्षाचे खरे सैनिक असल्याचे राहायचे असल्याचे मतही त्यंनी व्यक्त केलं आहे. पवन सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे.
पवन सिंह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षात सामील होण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी, पवन सिंह, माझ्या भोजपुरी समुदायाला सांगू इच्छितो की मी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षात सामील झालो नाही आणि मला विधानसभा निवडणूक लढवायचीही इच्छा नाही.” पवन सिंह यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या निवडणूक न लढवण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
अलीकडेच, पवन सिंह यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या अनेक बैठकींच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे पवन सिंह बिहारच्या निवडणुका लढवू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्यांनी स्वत:च निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट आता भोजपुरी चित्रपट आणि संगीतावर जास्त लक्ष देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर राजकीय विश्लेषकही याला भाजपची निवडणूक रणनीती म्हणून पाहत आहेत.
दरम्यान, पवन सिंग यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आहे. त्यांची पत्नी ज्योती सिंग यांच्याशी सुरू असलेला वाद सातत्याने माध्यमांमध्ये चर्चेत आले होते. ज्योती सिंह यांनी पवन सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे पवन सिंह चांगलेच चर्चेत आले होते. पण या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
Ranji Trophy 2025 : या तीन संघाचे बदलणार कर्णधार! नवीन सिझनसाठी असे दिसणार संघ, वाचा सविस्तर
सप्टेंबरमध्ये गायक आणि अभिनेता पवन सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे सहयोगी आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पवन सिंह एनडीएमधील कोणत्याही पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ सुरु झाली आहे.
याच दरम्यान, पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह यांनी जन सुरज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची भेट घेतली. भेटीनंतर ज्योती सिंह म्हणाल्या, “मी येथे निवडणूक लढवण्यासाठी किंवा तिकीट मागण्यासाठी आलेले नाही; पण माझ्यासारख्या अन्याय इतर इतर महिलांवरही होऊ नये, इतर महिलांनाही अशी परिस्थिती सहन करावी लागू नये, यासाठी मी आलो आहे.”
प्रशांत किशोर म्हणाले की, “ज्योती जी मला बिहारी महिला म्हणून भेटायला आल्या होत्या. आम्ही त्यांच्या म्हणण्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले. त्यांनी कधीही निवडणूक लढवण्याचा किंवा तिकीट मागण्याचा संकेत दिला नाही. त्यांचा हेतू फक्त त्यांच्या विरोधातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा आहे.”