
Satara Zilla Parishad locks toilets closed causing inconvenience to women and disabled people
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास
सातारा जिल्हा परिषदेत दररोज जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेकडो नागरिक आणि शासकीय अधिकारी बैठकांसाठी येत असतात. मात्र, इमारतीच्या तळमजल्यावर शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना पहिल्या मजल्यावर धाव घ्यावी लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि महिलांना याचा मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
दिव्यांग बांधवांची ससेहोलपट
जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये तळमजल्यावरच दिव्यांगांसाठीचे कार्यालय आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांनाही शौचालय बंद असल्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही लिफ्ट बंद असेल किंवा कामासाठी वरच्या मजल्यावर असेल तर जास्तच त्रास सहन करावा लागत आहे ,
हे देखील वाचा : ग्राहकांच्या संमतीशिवाय लावले जातायेत ‘स्मार्ट मीटर’; अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक
वाहन चालकांची कुचंबणा
दूरवरून येणाऱ्या अधिकाऱ्यांचे चालक आणि अभ्यागतांसाठी तळमजल्यावर शौचालयासाठी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्याने नेमके शौचालय कोठे आहे, याचा शोध घ्यावा लागतो वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून , तळमजल्यावरील बंद असलेले शौचालय तात्काळ स्वच्छ करून ते वापरासाठी खुले करावे , शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, पार्किंग आणि तळमजला परिसरात स्पष्ट दिसतील असे दिशादर्शक फलक लावावेत, महिला , ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्राधान्याने सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे
प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी भाजपा सातारा शहर सरचिटणीस विक्रम बोराटे उपस्थित होते
हे देखील वाचा : गोकुळ सभासद पात्रतेचे प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचला तातडीने निकालाचे आदेश