Bihar Assembly Election 2025:
Bihar Assembly Election 2025: गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांची आज (6 ऑक्टोबर) घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी ४ वाजता नवी दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी निवडणूक आयोग तारखांची अधिकृत घोषणा आणि किती टप्प्यात निवडणूक होतील याबाबत सविस्तर माहिती देतील. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. आगामी निवडणुका २२ नोव्हेंबरपूर्वी घेणे बंधनकारक असेल. बिहारमध्ये मतदान दोन टप्प्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांनी ऑक्टोबरच्या अखेरीस छठ सणानंतर लगेच निवडणुका घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला करण्यात आले आहे. या सणात परराज्यात काम करणारे अनेक नोकदार गावी आलेले असतात, त्यामुळे हा छठ सण झाल्यानंतर लगेचच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ज्ञानेश कुमार दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या एका पथकाने ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी बिहारला भेट दिली. या काळात, मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्ष, अधिकारी आणि पोलिस विभागाशी संपर्क साधला. कायदा आणि सुव्यवस्था आणि मतदान केंद्रांवरील व्यवस्थेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात झाल्या. त्यावेळी कोविड-१९ साथीच्या आजारामुळे निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहे.
BMC Ward Formation: मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभाग रचनेस मंजुरी: दिवाळीनंतर आचारसंहिता
बिहार निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असतानाच आता निवडणूक आयोगानेही पुन्हा अनेक बदल केले आहेत. यांसदर्भात आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. बिहारमध्ये एकूण ९०,००० बूथ असतील. यावेळी, कोणत्याही बूथवर १,२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. साधारणपणे, १,५०० किंवा त्याहून अधिक मतदार असताना लांब रांगा लागायच्या पण मतदारांची संख्या १२०० पर्यंत मर्यादित केल्यामुळे या रांगेत लागण्याची चिंता संपणार आहे.
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात झाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर २०२० रोजी ७१ विधानसभा जागांसाठी मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर रोजी ९४ जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. तर मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी झाली होती.