कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पाया खालील जमीन सरकते. या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडून जाते. महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा गंभीर आजार म्हणजे स्तनाचा कर्करोग. हल्ली स्तनाचा कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतील. (फोटो सौजन्य – istock)
Breast Cancer सारख्या गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
सकाळच्या नाश्त्यात कायमच एक डाळिंब खावे. डाळिंब खाल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच यामध्ये एलाजिटानिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स आढळून येते, ज्यामुळे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढत नाहीत.
रोजच्या आहारात ब्रोकोली, फुलकोबी आणि कोबी इत्यादी भाज्यांचा समावेश करावा. या भाज्या लहान मुलांना खायला आवडत नाहीत. ब्रोकोलीचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते.
स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून सोयाबीन, टोफू आणि मसूर इत्यादी प्रथिने युक्त पदार्थांचे आहारात नेहमीच सेवन करावे. यामध्ये आयसोफ्लाव्होन नावाचे एंजाइम आढळून येते, ज्यामुळे इस्ट्रोजेनचा प्रभाव कमी होतो.
विटामिन सी युक्त पदार्थांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. त्यातील अतिशय गुणकारी पदार्थ म्हणजे आवळा. आवळा खाल्यामुळे शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते.
आकाराने बारीक असलेल्या अळशीच्या बियांचे नियमित सेवन केल्यास हार्मोनशी संबंधित कर्करोगाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. अळशीच्या बिया दह्यात मिक्स करून सुद्धा खाल्ल्या जातात.