CM Rekha Gupta : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री; भाजपकडून महिला नेत्याला नेतृत्वाची संधी
Delhi CM Rekha Gupta: दिल्ली विधानसभेत भाजपने आम आदमी पक्षाचा मोठा पराभव केला आहे. दरम्यान उद्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे. त्याआधी म्हणजेच आज भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अखेर दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. भाजप आमदार रेखा गुप्ता यांची विधिमंडळ गटाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. उद्या रेखा गुप्ता या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर परवेश वर्मा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
श्रीमती रेखा गुप्ता जी को दिल्ली भाजपा विधायक दल का नेता चुने जाने पर हार्दिक बधाई एवं अशेष शुभकामनाएँ।
हमें पूर्ण विश्वास है कि आपके नेतृत्व में प्रदेश उत्तरोत्तर प्रगति करेगा। pic.twitter.com/K8Mu5SyvdV
— BJP Delhi (@BJP4Delhi) February 19, 2025
दिल्ली भाजपची आज संध्याकाळी महत्वाची बैठक पार पडली. पर्यवेक्षक रवीशंकर प्रसाद आणि ओपी धानखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रेखा गुप्ता यांची विधिमंडळ गटाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपा के शीर्ष नेतृत्व एवं विधायक दल का धन्यवाद #viksitdelhi@BJP4India @BJP4Delhi @narendramodi @Virend_Sachdeva @JPNadda @praveendel @rsprasad @OPDhankar pic.twitter.com/qFe2iWq72J
— Rekha Gupta (@gupta_rekha) February 19, 2025
या बैठकीला 48 आमदार, भाजपचे 7 खासदार आणि अन्य महत्वाचे नेते उपस्थित होते. दरम्यान अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे परवेश वर्मा यांना मुख्यमंत्री केले जाईल अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्रच वापर करत दिल्लीची कमान महिलेच्या हातात देण्याचे ठरवले. त्यानंतर विधिमंडळ गटाच्या नेतेपदी रेखा गुप्ता यांची निवड झाली. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर झाले. रेखा गुप्ता या उद्या दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
रेखा गुप्ता यांना शालिमार विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान त्यांनी पहिल्याच निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे. त्यांनी शालिमार विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा 29 हजार मतांनी पराभव केला आहे. रेखा गुप्ता या लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक राहिल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून रेखा गुप्ता यांनी राजकारणात प्रवेश केला. 1994 ते 1995 च्या काळात त्यांची सचिव म्हणून दौलत राम कॉलेजमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. 1995-1996 मध्ये दिल्ली विश्वविद्यालय विद्यार्थी संघाच्या त्या सचिव बनल्या होत्या. तर 1996 ते 1997 मध्ये रेखा गुप्ता अध्यक्ष बनल्या.
भाजपचे केंद्रीय निरीक्षक प्रसाद आणि धनखड यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार पार पडली. . पक्षाच्या आमदारांनी नेता म्हणून निवड केल्यानंतर, मुख्यमंत्री रेखा गुप्ता या राज निवास येथे दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. शपथविधीची तयारी जोरात सुरू आहे, रामलीला मैदानावर होणाऱ्या नवीन सरकारच्या भव्य शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. उद्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या समारंभाला काही खास पाहुण्यांसह सुमारे ५० हजार लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.