आठवड्याभरापुर्वी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या पत्नीची कार दिल्लीतून चोरीला गेली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता. अखेर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून चोरीला गेलेली एसयूव्ही कार जप्त करण्यात आली आहे. जेपी नड्डा यांची पत्नी मल्लिका नड्डा (Malika Nadda) यांची फॉर्च्युनर कार दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून १९ मार्च रोजी चोरीला गेली होती.
[read_also content=”रामलल्लाला उकाड्यापासून वाचवण्यासाठी मंदिरात बसवले कुलर, दही हंगामी फळांचा प्रसाद अर्पण! https://www.navarashtra.com/india/cooler-installed-to-protect-ram-lalla-from-heat-rabri-and-curd-being-offer-nrps-521338.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार दिल्लीतून चोरीला गेल्याच्या काही आठवड्यांनंतर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी ही कार हरियाणा, हिमाचल आणि यूपीमार्गे नागालँडला नेण्याचा प्रयत्न करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिका नड्डा यांच्या फॉर्च्युनर कारचा चालक कार सर्व्हिस करून घेतल्यानंतर गोविंदपुरी येथील त्याच्या घरी जेवणासाठी गेला होता, तेथून ती चोरीला गेली. यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून वाहनाचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, नड्डा यांच्या पत्नीची चोरी झालेली फॉर्च्युनर कार गुरुग्रामच्या दिशेने जाताना दिसली होती आणि तिच्याकडे हिमाचल प्रदेशच्या नंबर प्लेट होत्या.
“आम्ही या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी उघड केले की त्यांनी मागणीवर असलेली SUV चोरली होती आणि ती नागालँडला नेण्याचा त्यांचा विचार होता,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.